ऐश्वर्या राय बच्चन कदाचित पहिली अशी अभिनेत्री असावी जिची डिमांड लग्न आणि आई झाल्यानंतरसुद्धआ कायम आहे. 1994मध्ये जगतसुंदरीचा किताब आपल्या नावी करणारी ऐश्वर्या जेव्हा जेव्हा रुपेरी पडद्यावर अवतरली तेव्हा तेव्हा तिच्या सौंदर्याची भूरळ तिच्या चाहत्यांना पडली आहे. जणू वाढत्या वयासोबत ऐश्वर्याच्या सौंदर्यात भरच पडत आहे. तिच बॉलिवूडची खरी क्वीन आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
अलीकडेच ऐश्वर्याने एका ज्वेलरी ब्रॅण्डसाठी अॅड शूट केली. या जाहिरातीत ऐश्वर्या नववधूच्या रुपात दिसत आहे. ब्रायडल आउटफिट आणि दागिन्यांत ऐश्वर्या कमालीची सुंदर दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच ज्वेलरी शोरुमच्या ओपनिंगवेळी दिल्लीत पोहोचलेल्या ऐश्वर्याची एक झलक बघण्यासाठी तिचे असंख्य चाहते जमा झाले होते. आता तिचे चाहते रुपेरी पडद्यावर तिच्या रिएन्ट्रीची वाट पाहात आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा नववधूच्या रुपात अवतरलेल्या ऐश्वर्याची खास झलक...