मुंबई: 11 नोव्हेंबर रोजी महानायक
अमिताभ बच्चन वयाचे 72 वर्षे पूर्ण करत आहेत. एकीकडे,
बिग बींचे चाहते त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची स्पेशल तयारी करत आहेत. तसचे अमिताभ यांची सून आणि अभिनेत्री
ऐश्वर्या राय बच्चनसुध्दा या निमित्त सेलिब्रेशनचे स्पेशल प्लानिंग करत आहे. मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बिग बी यांच्यासाठी सरप्राइज पार्टीचे आयोजन केल्याचे कळते.
इंडस्ट्रीच्या संबंधित एका सूत्राच्या सांगण्यानुसार, 'ऐश्वर्या राय बच्चन
आपल्या सास-याच्या वाढदिवसानिमित्त मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सरप्राइज बर्थडे पार्टी प्लान करत आहे. ही पार्टी खूप खूप मोठी असणार आहे. ऐश्वर्याने या पार्टीसाठी जवळचे मित्र परिवार, कुटुंबीयांना आमंत्रित केले आहे. सोबतच, पार्टीत गाणी वाजवली जाणार आहे. त्यामध्ये बिग बींचे हिट गाणी ऐकवली जाणार आहेत. ऐश्वर्याने या पार्टीत बिग बींच्या आवडीचे जेवण ऑर्डर केले आहे.'
अलीकडेच, एका इव्हेंटमध्ये अभिषेकला विचारण्यात आले होते, की बिग बींच्या बर्थडेचे काय प्लानिंग आहे? त्याने सांगितले, 'मी तुम्हाला आमचे प्लॅनिंग का सांगू? हा त्यांच्या चाहत्यांसाठी खूप मोठा दिवस आहे. मीसुध्दा माझ्या वडिलांचा खूप मोठा चाहता आहे. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.'
अभिषेकने तर आधीच बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्या सरप्राइज प्लान करण्यात व्यस्त आहे. टि्वटर आणि
फेसबुकवर बिग बींच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. बिग बींनीसुध्दा त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून व्हिडिओच्या माध्यमातून आभार व्यक्त केले. बिग बींनी नुकताच एक व्हिडिओ
ट्विटरवर अपलोड केला आहे आणि चाहत्यांचे आभार मानले आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा (
https://twitter.com/SrBachchan/status/520216382961483777?s=09)
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टि्वटरवर बिग बींवर झाला शुभेच्छांचा वर्षाव...सोबतच, बिग बींनी कसे मानत आहेत चाहत्यांचे आभार...