आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Raj's Youtube Videos Get International Fame

21 वर्षांची आहे ही गायिका, Youtubeवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओमुळे झाली जगप्रसिद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मॉडेल आणि गायिका ऐश्वर्या राज)

रायपूरः ऐश्वर्या राज या तरुणीचा गाण्याचा एक व्हडिओ यूट्युब धूम करतोय. 'व्हेन आय एम अलोन...' हे शब्द असलेले गाणे एनएम चॅनलच्या जागतिक रॅकिंगच्या टॉप 100मध्ये सामिल झाले आहे. या गाण्याचे बोल ऐकुन आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मला इमेल येतील याचा विचारही मी कधी केला नव्हता. फेब्रुवारी महिन्यात याचे व्हडिओ व्हर्जन लाँच करणार असल्याचे ऐश्वर्याने सांगितले.
गीतकार, संगीतकार आणि मॉडेल आहे ऐश्वर्या...
युट्यूबवर ऐश्वर्याची आत्तापर्यंत चार गाणी अपलोड झाली असून त्याला हजारोच्या संख्येत लाईक्स मिळाले आहेत. बेबी आय वाँट यू..., आय हॅव लाइड..., रिअल मी... या गाण्याचे बोल ऐश्वर्यानेच लिहिले असून स्वतःच स्वरबद्ध केले आहेत. या गाण्याचे संगीतदेखील तिने स्वतः केले आहे. इतकेच नाही तर व्हिडिओत अभिनयसुद्धा स्वतः ऐश्वर्यानेच केला आहे. ती सांगते, गीत लिहितानाच माझ्या डोक्यात ट्युन तयार झालेली असते. नंतर स्टुडिओत काही मित्रांच्या मदतीने ट्रॅक तयार करते.
अभ्यासासोबत मॉडेलिंग...
21वर्षीय ऐश्वर्या राज ही रायपूर येथील अवंती विहार निवासी आणि क्रेडाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रमेश सिंह भाखुनी आणि बबीता भाखुन यांची कन्या आहे. ती सध्या चेन्नई येथील कॉलेजमधून इन्फॉर्मेशन आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे. मात्र अभ्यासासोबतच ऐश्वर्या साउथच्या अनेक ब्रॅण्ड्साठी मॉडेलिंगसुद्धा करते. बालपणापासूनच तिची मॉडेल आणि अभिनेत्री होण्याची इच्छा आहे.
काही तामिळ सिनेमांच्या ऑफर्स तिला आल्या आहेत. मात्र इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहे. जर बॉलिवूडमध्ये यश मिळाले नाही, तर एमबीए करण्याचे तिने ठरवले आहे.
मॉडेलिंगच्या अनेक ऑफर्स...
ऐश्वर्याने सांगितले, की 2011 मध्ये लेडी क्वीन ब्युटी पेजेंटमध्ये सहभागी झाल्यानंतर मॉडेलिंगच्या अनेक ऑफर्स मिळाल्या. त्यानंतर अभ्यास आणि फोटोशूट्समध्ये मी बिझी झाले. बालपणापासून इंग्रजी गाण्यांची आवड असलेल्या ऐश्वर्याने काही मित्रांना तिने लिहिले गाणे ऐकवले. ते गाणे ऐकून मित्रांचे डोळे पाणावले. मित्रांच्या आग्रहाखातर ऐश्वर्याने या गाण्याचा व्हिडिओ बनवून युट्यूबवर अपलोड केला. आत्तापर्यंत ऐश्वर्याने चार गाणी युट्यूबवर अपलोड केली आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा ऐश्वर्याच्या गाण्याचा व्हिडिओ...