आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय बहलच्या 'बी.ए. पास-2'चे शुटिंग सप्टेंबरपासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या युवा दिग्दर्शक अजय बहलच्या 'बी.ए.पास'ने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत आणि भारतीय प्रेक्षकांची तोंडभरून प्रशंसा मिळवली आहे. आता याच चित्रपटाचा सिक्वेल बनवण्यात येत आहे. सुरुवातीला महेश भट्ट यांच्या बॅनरने अजयसोबत 'सिटी लाइट्स' बनवण्याचा करार केला आला होता, पण बजेटवरून वाद निर्माण झाल्याने तो या प्रोजेक्टमधून बाहेर पडला.
आता अजय 'बी.ए.पास-2' बनवण्यात व्यग्र होणार आहे. या चित्रपटातील कलावंतांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शुटिंग सप्टेंबरपासून सुरू होणार असून त्यासाठी मध्य प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील काही स्थळांची निवड करण्यात आली आहे. मूळ चित्रपटात शिल्पा शुक्लाची प्रमुख भूमिका होती. शिल्पा अजयच्याच 'होटल ग्रँड'मध्ये असेल. या चित्रपटाचे शुटिंग 'बी.ए.पास-2'नंतर सुरू होईल. यामध्ये अभय देओलला संधी मिळण्याची शक्यता आहे.