आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजयच्या सुट्या रद्द होणार, कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे गणित बिघडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन चित्रपटांचे लागोपाठ शूटिंग आणि प्रदर्शनाच्या धावपळीनंतरदेखील अजय देवगण आपल्या कुटुंबीयांसाठी निश्चित केलेल्या सुट्या घेऊ शकणार नाही. या सुट्यांच्या आड प्रभुदेवाचा 'अँक्शन जॅक्सन' येत आहे.
अजय देवगणने चित्रपटांपेक्षा आपल्या कुटुंबाला आणि वैयक्तिक आयुष्याला अधिक महत्त्व दिले आहे. त्यामुळे तो सुट्या सोडत नाही. मात्र, या वेळी असे होणार नाही. कारण 'सिंघम रिटर्न्‍स'च्या शूटिंगचा शेवट होताच तो 5 जुलैपासून अर्धवट राहिलेल्या 'अँक्शन जॅक्सन'चे शूटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटाचे 25 दिवसांचे शूटिंग आणि तीन गाण्यांचे चित्रीकरण काम बाकी आहे. वास्तविक, चित्रपटाचे शूटिंग 15 ऑगस्ट रोजी 'सिंघम रिटर्न्‍स' प्रदर्शित झाल्यानंतर होणार होते. मात्र, चित्रपटाचा दिग्दर्शक प्रभुदेवा रेमो डिसूझाच्या 'एबीसीडी-2'मध्ये अभिनय करणार आहे. याचे पहिले शेड्यूल मुंबईत आणि दुसरे लंडनमध्ये होणार आहे.
'एबीसीडी-2'ची एक महिन्याचे शूटिंग ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार्‍या 'अँक्शन जॅक्सन'च्या पोस्ट प्रोडक्शनसाठी प्रभुदेवाला वेळ मिळणार नाही. त्यामुळे त्याने अजयला चित्रपटाचे उर्वरित शूटिंग याच महिन्यात करण्याची विनंती केली. अजय 'सिंघम रिटर्न्‍स'च्या डबिंगनंतर कुटुंबीयांसमवेत सुट्या साज-या करण्याच्या विचारात होता. यादरम्यान देवगण कुटुंबाने लंडनमधील हॉलिडे होममध्ये 10 दिवस सुटी साजरी करण्याचे नियोजन केले होते. या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यासोबतच त्याच्या वडिलांची तब्येतही खराब झाली होती. तरीदेखील अजयने केवळ 8 दिवसांचा ब्रेक घेतला होता. मात्र, प्रभुदेवाच्या सांगण्यावरून आणि 'अँक्शन जॅक्सन'च्या पोस्ट प्रॉडक्शनला भरपूर वेळ देण्यासाठी अजयने पत्नी काजोल आणि आपल्या मुलांसोबत (न्यासा आणि युग) चर्चा केली आहे.
अजय आता 5 जुलैपासून 'अँक्शन जॅक्सन'चे 25 दिवसांचे शूटिंग आणि 'सिंघम रिटर्न्‍स'च्या उर्वरित डबिंगचे काम करणार आहे. त्यानंतर 2 ऑगस्टपासून 'सिंघम रिटर्न्‍स'चे प्रमोशन करण्यात येईल. त्यामुळे 15 ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच अजय देवगण आपल्या कुटुंबीयांसमवेत सुट्या साज-या करण्यास जाऊ शकतो.