आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajay Devgan No Competition With Shahrukh Khan, Why

अजय म्हणतो, \'शाहरुख खानसोबत वैर, नको रे बाबा...\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन वर्षांपूर्वी 'सन ऑफ सरदार' आणि 'जब तक है जान'च्या प्रदर्शनावेळी चित्रपटगृहांच्या चुकीच्या वाटपाबाबत अजय देवगण आणि शाहरुख खान यांच्यात वाद निर्माण झाले होते. मात्र, या वेळी अजयने माघार घेतली आहे.
अजय देवगणने आपल्या 'सन ऑफ सरदार'बाबत बोलताना दोन वर्षांपूर्वी शाहरुख आणि यशराज बॅनरने चुकीच्या पद्धतीने जास्तीत जास्त चित्रपटगृहे 'जब तक है जान'साठी मिळवल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण स्पर्धा आयोगापर्यंत गेले. परिणामी, यशराज आणि काजोल यांचे संबंध अजयमुळे बिघडले. तसेच अजय आणि यशराज-शाहरुख एकमेकांशी बोलत नव्हते. या वेळीही तीच स्थिती आहे, परंतु अजय वाद टाळण्याचा प्रयत्न करत आहे. वस्तुत: अजयच्या 'अॅक्शन जॅक्सन'चे 25 दिवसांचे चित्रीकरण बाकी आहे. त्यामुळे मे महिन्यातील प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 15 ऑगस्टला त्याचा 'सिंघम-2' प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर डिसेंबरपर्यंत सर्व तारखांना एक नव्हे, तर तीन-तीन चित्रपट प्रदर्शित व्हायचे आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या याविषयी अजयचे काय आहे म्हणणे...