आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajay Devgan Starer ‘Singham Returns’ In Controversy

'सिंघम रिटर्न्स' अडकला वादाच्या भोवर्‍यात, चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चित्रपटाच्या एका दृश्यात अमोल गुप्ते आणि अजय देवगण)
पणजी - अजय देवगण अभिनीत सिंघम रिटर्न्स या चित्रपटाच्या प्रदर्शनाला काही दिवस बाकी असतानाच या चित्रपटाबद्दल वाद सुरू झाला आहे. नुकतेच एका दक्षिणात्य हिंदू संघटना 'हिंदू जनजागृती समिती' (HJS) ने चित्रपटात हिंदू संतांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप करत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटात हिंदू संताना चुकीच्या पध्दतीने दाखवण्यात आले असल्याचा या समितीचा आरोप आहे.
याबद्दल समितीचे रमेश शिंदे म्हणाले की, "चित्रपटात हिंदूच्या धार्मिक भावनेला दुखावले आहे. या चित्रपटात एका हिंदू संताला खलनायकाच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. चित्रपटाचा नायक अजय देवगण त्या संताला धमकी देतो की, "मी तुझे फालतू प्रवचन ऐकायला आलो नाही," एवढेच नव्हे तो त्याला जीवे मारण्याची धमकीही देतो. यामुळे हिंदूंच्या श्रध्देला धक्का बसला आहे."
या संदर्भात हिंदू जनजागृती समितीने सेंट्रल फिल्म सेंसर बोर्ड आणि चित्रपटाचे दिग्दर्शकांना पत्र लिहून हे दृश्य कापण्यास सांगितले आहे. जर हे दृश्य न कापताच चित्रपट प्रदर्शित झाला तर आम्ही संपूर्ण देशात आंदोलन करू अशी चेतावणी हिंदू जनजागृती समितीने दिली आहे. रोहित शेट्टीचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट येत्या 15 ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगणसोबतच करीना कपूर, अमोल गुप्ते, अनुपम खेर आणि दयानंद शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

पुढील स्लाईडमध्ये पाहा - चित्रपटातील हिंदू संताच्या भूमिकेतील असलेल्या अमोल गुप्ते यांचे काही फोटो...