आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajay Devgan's Action Jackson Title To Be Changed

अजयच्या 'अँक्शन जॅक्सन'चे नाव बदलण्यासाठी दबाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड स्टुडिओ या दिवसांमध्ये भारतीय चित्रपटांवर लक्ष ठेवून आहे. याबाबतचे ताजे उदाहरण म्हणजे एका पंजाबी चित्रपटाच्या नावावरून झालेला वाद. हा वाद इरोस इंटरनॅशनलच्या 'आर.. राजकुमार' चित्रपटाबाबतदेखील झाला होता. चित्रपटाचे पूर्वीचे नाव 'रॅम्बो राजकुमार' होते. मात्र, हॉलिवूड स्टुडिओने 'रॅम्बो'वर कॉपीराइट होण्याचा उल्लेख करत नाव बदलण्यास सांगितले. शेवटी 'आर.. राजकुमार' या नावाने चित्रपट प्रदर्शित झाला.
नुकतेच 'रॅम्बो रांझा' या पंजाबी चित्रपटाला हॉलिवूड स्टुडिओने चित्रपटाचे नाव बदलण्याबाबतची नोटीस पाठवली आहे. पॉप सिंगर जँजी बी आणि मोनिका बेदीची उपस्थिती असलेल्या या चित्रपटाला आपली रिलीज डेट एप्रिलमध्ये ढकलावी लागली. शिवाय चित्रपटाचे नाव बदलून ते 'रोमियो रांझा' हे ठेवावे लागले. आता हॉलिवूड स्टुडिओची नजर 'अँक्शन जॅक्सन' चित्रपटावर पडली आहे.
अजय देवगण अभिनीत या चित्रपटाच्या नावाबाबत हॉलिवूड स्टुडिओने कायदेशीररीत्या पावले टाकण्यास सुरुवात केल्याचे अगोदरच स्पष्ट केले होते. चित्रपटाची रिलीज डेट पुढे गेली आहे. मात्र, निर्माता गोवर्धन तनवाणीने अद्याप या समस्येवर आपला निर्णय जाहीर केला नाही. सूत्रांनुसार प्रभुदेवाच्या दिग्दर्शनामध्ये बनत असलेल्या या चित्रपटावर नाव बदलण्यासाठी दबाव वाढवण्यात आल्याचे कळते. त्यामुळे आता या चित्रपटाचे नाव बदलणार का आणि बदलले तर ते काय असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.