‘हीरोपंती’ या पहिल्या सिनेमानंतर टायगर श्रॉफला अनेक सिनेमांचे प्रस्ताव आले आहेत. सूत्रानुसार, टायगरच्या अभिनयाची आणि अॅक्शनची प्रशंसा प्रेक्षकांबरोबरच आमिर खान,
सलमान खान आणि अजय देवगण सारख्या दिग्गज अभिनेत्यांनीही केली आहे. यादरम्यान अजयने टायगरची भेट घेऊन त्याला आपल्या बॅनरसाठी सिनेमा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
या सिनेमाचे दिग्दर्शन रेमो डिसूजा करणार असून अजयचे बॅनर या सिनेमाची निर्मिती करणार आहे. सध्या टायगर एकता कपूरच्या बॅनरचा एक सिनेमा करत असून याचे दिग्दर्शनदेखील रेमो डिसूजा करत आहे.