आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajay Devgan's Little Daughter Nysa Turns Filmmaker

अजयच्या पाऊलावर पाऊल ठेऊन चालतेय मुलगी न्यासा, वयाच्या 11व्या वर्षी बनवते शॉर्ट फिल्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अजय देवगण मुलगी न्यासासह)
मुंबई: अजय देवगण मुलगी न्यासासह सिनेमा निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. 11 वर्षांची न्यासा एक शॉर्ट फिल्म तयार करत आहे. देवगण कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्राच्या सांगण्यानुसार, 'सिनेमा निर्मितीमध्ये न्यासाला रुची आहे. ती एक शॉर्ट फिल्म तयार करत आहे. हा सिनेमा तिच्या शालेय शिक्षणाचा एक भाग आहे. फिल्मी जगाशी त्याचे काही एक घेणे-देणे नाहीये. ती याविषयी खूप उत्साही असून आपल्या फ्रेंड्ससह यावर काम करत आहे. काजोल आणि अजयदेखील या कामात आपल्या मुलीला साथ देत आहेत.'
न्यासाचे वडील अजय देवगण अभिनेतासह सिनेमा निर्मातादेखील आहे. त्याच्या प्रॉडक्शनचा 'राजू चाचा' हा पहिला सिनेमा 2000मध्ये रिलीज झाला होता. 'ऑल द बेस्ट' (2009) या कॉमेडी आणि सुपरहिट सिनेमाचेदेखील त्याच्या प्रॉडक्शन हाउसने निर्मिती केली आहे. अलीकडेच, आजयचा रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम रिर्टन्स' रिलीज झाला आहे. अजय या सिनेमाचा निर्माता आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अजय आणि काजोलची मुलगी न्यासाची काही छयाचित्रे...