आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हमशकल्स'चा दिग्दर्शक साजिद खानला अजय म्हणाला बेवकूफ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - अजय देवगण)
मुंबई- बॉक्स ऑफिसवर 'हिम्मतवाला' फ्लॉप झाल्यानंतर साजिद आणि अजयमध्ये काहीतरी गडबड असावी असं वाटतंय. 'हमशकल्स'च्या पत्रकार परिषदेत साजिद म्हणाला होता, की 'हिम्मतवाला' फ्लॉप झाल्याने तो खुश आहे. साजिदचे हे म्हणणे जेव्हा अजय देवगणपर्यंत पोहोचले तेव्हा त्याची प्रतिक्रिया चकीत करणारी होती. तो म्हणाला, "काय म्हणाला तो? तो आनंदी आहे, त्याला सांगा तो सगळ्यात मोठा बेवकूफ आहे." अजय हसत हसत म्हणाला, की तो माझा मित्र आहे आणि मी त्याला फोन करून शिव्या देणार आहे.
अजय पुढे म्हणाला, की त्याने आजपर्यंत 'रास्कल्स' आणि 'हिम्मतवाला' हे सिनेमे पाहिले नाहीत. तो म्हणाला, माझा सिनेमा तयार होत असतानाच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालेल की नाही मला कळतं. 'हिम्मतवाला'ची स्क्रिप्ट अत्यंत चांगली होती. त्यासाठी मी साजिदला दोषी धरणार नाही, परंतू साजिदने 'हिम्मतवाला' 80 दशकाच्या प्लॉटवर शूट केला होता. या सिनेमात कोणतीच पंच लाइन नव्हती. जर सिनेमात एखादी पंच लाइन असली असती तर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला चालला असता.
तो म्हणाला, की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या सिनेमात काम करत असता तेव्हा तुमचे म्हणणे सगळ्यांनाच पटेल असे नाही. परंतू एखाद्या सिनेमासाठी जेव्हा तुम्हाला पैसे मिळतात, तुम्ही त्यासाठी आपले बेस्ट देण्याचा प्रयत्न करता. अजयने साजिदकडे इशारा करत सांगितले की, जेव्हा तुमचा दिग्दर्शक तुम्हाला 'ट्रस्ट मी', 'ट्रस्ट मी' असे म्हणतो तेव्हा तुम्हाला त्याच्यावर ट्रस्ट करावाच लागतो. अजयचे हे बोलणे ऐकून वाटते की 'हिम्मतवाला'चे अपयश अजूनही त्याच्या डोक्यातून गेलेले नाही.