आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajay Devgn, Rani Mukerji, Varun Dhawan: Stars Celebrate Dahi Handi Festival

दहीहंडी उत्सवात दिसली वरुण-अनिलसह अनेक बॉलिवूडची सेलेब्सची धूम, PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दहीहंडी उत्सवात अभिनेता वरुण धवन आणि अनिल कपूर)
मुंबई - सोमवारी मोठ्या जल्लोषात सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. बी
टाऊनमधील कलाकारमंडळीसुद्धा या उत्सवात आनंदाने सहभागी झाली होती. वरुण धवन, अजय देवगण, राणी मुखर्जी, बिपाशा बसू, माधुरी दीक्षित, अनु कपूर, ईशा कोप्पिकर, डायरेक्टर मधुर भंडारकर, बोमन ईरानी, अनिल कपूर, चंकी पांडे, रंजीत, गोविंदा, जितेंद्र यांच्यासह बरेच सेलेब्स गोविंदांचा उत्साह वाढवताना दिसले.
अजय देवगणचा अलीकडेच 'सिंघम रिटर्न्स' हा सिनेमा रिलीज झाला. दहीहंडीत तो दिग्दर्शक रोहित शेट्टीसह पोहोचला होता. तर दुसरीकडे राणी मुखर्जी तिच्या आगामी 'मर्दानी' या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसली. तिच्यासह अनेक फॅन्स होते. त्यांनी मर्दानी लिहिलेले टी-शर्ट घातले होते. दिग्दर्शक मधुर भंडारकर पत्नी आणि मुलीसह या उत्सवात सहभागी झाले होते. यावेळी माधुरी दीक्षितची एक झलक बघण्यासाठी चाहते आतुर झालेले दिसले.
दहीहंडीच्या उत्सवात अभिनेता वरुण धवनने ताल धरला होता. तर विनोदवीर सुनील पालनेसुद्धा प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या सेलेब्सची खास झलक...