आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ajay Devgn, Saif Ali Khan And Akshay Kumar Wants To Work With Murgdoss

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुरुगादास यांच्यासह काम करण्याची अक्षय, अजय आणि सैफची इच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुरूगादास हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे ड्रिम दिग्दर्शक बनले आहेत. आमिर खानसोबत बनवलेल्या 'गजनी'ने 104 कोटी रुपये कमावले. यामध्ये सर्वाधिक योगदान सुरूवातीला आमिरचे मानले गेले. मात्र हा गैरसमज नुकताच रिलीज झालेल्या 'हॉलिडे: अ सोल्जर इज नेव्हर ऑप ड्यूटी'सोबत दूर झाला आहे.
अक्षय कुमार आणि सोनाक्षी अभिनीत या सिनेमाने दोन आठवड्यात 100 कोटींचा गल्ला जमवला. समीक्षकांनीसुध्दा या सिनेमाची प्रशंसा केली आहे. अक्षयच्या करिअरला काही दिवसांपासून घरघर लागल्याचे जाणवत होते. मात्र या सिनेमाने त्याला पुन्हा आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये आणून बसवले आहे. समीक्षकांनीसुध्दा त्याला या सिनेमासाठी पाच स्टार दिले.
आता अक्षयच नव्हे तर अजय देवगण आणि सैफ अली खान यांनासुध्दा मुरुगादास यांच्या दिग्दर्शित सिनेमात काम करण्याची इच्छा आहे. तिघांचे प्रवक्ते आणि मित्र मुरुगादास यांच्यापर्यंत संदेश आणि ऑफर घेऊन जात आहे.
अक्षयकडून 'हॉलिडे...'चा सह-निर्माता विपुल शाह, अजयसाठी त्याचा सचिव आणि मित्र कुमार मंगत आणि सैफसाठी इलुमिनाटी फिल्म्सचे उच्च अधिकारी मुरुगादास यांच्या येत्या प्रोजेक्टशी जोडण्याच्या गोष्टी करत आहेत. फॉक्स स्टार स्टुडिओ, इरोस इंटरनॅशनल आणि वायाकॉम18नेसुध्दा त्यांना सिनेमा दिग्दर्शित करण्याचे प्रस्ताव पाठवले आहेत.
मुरुगादास यांच्या कार्यशैलीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केलेला असतो. मात्र, ते जून्या ट्रेंडवर आधारित सिनेमे बनवतात. शुटिंगदरम्यान प्रत्येक फ्रेमवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. त्यांच्या प्रत्येक सिनेमात प्रेक्षकांना काहीतरी वेगळे बघण्यास मिळते, हे त्यांचे वैशिष्टे आहे. सिनेमाच्या शुटिंगवेळी 10 दिवस ते अतिरिक्त दिवस री-शुटसाठी ठेवतात. आश्चर्य वाटते, की कार्पोरेट स्टुडिओ आणि स्टार्स त्यांच्या अशा अटींवर एका पायावर काम करण्यास तयार होतात.