आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajay Devgn Talks About On Equation With Shahrukh Khan

अजय म्हणाला, 'शाहरुख आणि माझ्यात कसलेही शत्रुत्व नाही'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अजय देवगण पहिल्यांदा औपचारिकरित्या शाहरुख आणि त्याच्यामधील नात्यावर बोलला आहे. दोघांच्या जगजाहिर वादात रोहित शेट्टी शांतीदूत बनला आहे. शाहरुख आणि अजय यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी आता रोहित आपल्या ‘सिंघम रिटर्न्‍स’सोबत शाहरुखच्या ‘हॅप्पी न्यू इअर’चा ट्रेलर रिलीज करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन वर्षांपूर्वी 'जब तक है जान' आणि 'सन ऑफ सरदार' या सिनेमांच्या रिलीजदरम्यान शाहरुखच्या यशराज फिल्म्सने सर्वाधिक थिएटर आपल्या ताब्यात घेतल्याने अजय देवगण नाराज झाला होता. त्याने दोघांना कायदेशिर नोटिस पाठवल्याने खासगी नात्यात दुरावा निर्माण झाला होता.
यशराज यांच्या अनेक खास कारणांवर अजय-काजोल अनुपस्थित राहत होते. शाहरुखच्या 'मन्नत'मध्ये झालेल्या पार्टीत काजोल एकटी पोहोचली होती.
या वादावर अजयने सांगितले, 'आमच्यात संभाषण होण्यासारखे काहीच नाहीये. त्यामुळे त्याचा अर्था असा नाही, की आमच्यात शत्रुत्व आहे. सिनेमाच्या रिलीजवेळी आम्ही आपआपल्या सिनेमांचा बचाव करत होतो. सिनेमे रिलीज झाले विषय संपला. तसे पाहता हा वाद आमच्या निर्मात्यांमध्ये होता. याच्याशी शाहरुखचे काही घेण-देण नव्हते. त्यानंतर यशराज यांच्याकडूनही हा वाद संपुष्टात आला होता.'

त्याने पुढे सांगितले, 'शाहरुख आणि मी रोज सोबत ड्रिंक करत नाही, याचा अर्थ आम्ही चांगले मित्र नाहीत असा होत नाही. आम्ही एकाच इंडस्ट्रीतून आहोत आणि एकमेकांना पाठिंबा देतो.' यावरून या दोन्ही स्टार्समधील समीकरण बदलले दिसते. यशराज यांच्याशी मतभेद झालेल्या अजयच्या 'अ‍ॅक्शन जॅक्सन' सिनेमाचा भव्य सेट याच स्टुडिओमध्ये लागणार आहे.
शाहरुखच्या 'हॅप्पी न्यू इअर'चा ट्रेलर अजयच्या 'सिंघम रिटर्न्स'सह रिलीज होणार आहे. व्यवसायाशी जोडलेल्या सूत्रांच्या मते, 'शाहरुखला 'हॅप्पी न्यू इअर'चा ट्रेलर ऑक्टोबरमध्ये रिलीज होणा-या मोठ्या सिनेमासह आणण्याचा विचार करत होता. 'किक'नंतर 'सिंघम रिटर्न्स' आणि 'बँग बँग' हे दोन्ही सिनेमे ऑक्टोबरमध्ये रिलीज होणारे बिग बजेट सिनेमे आहेत. त्यातील 'सिंघम...' त्याला योग्य वाटला. कारण त्याला प्रमोशनसाठी वेळही मिळू शकतो.'