आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajay Devgn Throws A Private Party On The Success Of Singham Returns

Exclusive: सिंघम रिटर्न्सच्या यशामुळे आनंदीत अजयने ठेवली प्रायव्हेट पार्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - अजय देवगणला केक भरवताना दिग्दर्शक रोहित शेट्टी )
अभिनेता अजय देवगणच्या सिंघम रिटर्न्स या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळत आहे. केवळ पाच दिवसांत या सिनेमाने शंभर कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे.
ट्रेड पंडित तरण आदर्श यांनी ट्विट केले, ''सिंघम रिटर्न्सने शुक्रवारी 32.09 कोटी, शनिवारी 21.05 कोटी, रविवारी 24.55 कोटी, सोमवारी 14.78 कोटी आणि मंगलवारी 8.21 कोटींची कमाई केली. अर्थातच या सिनेमाचा एकुण कमाईचा आकडा 100.68 कोटी रुपये एवढा आहे.''
सिनेमाला मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी अजय देवगणने या सिनेमाचा दिग्दर्शक रोहित शेट्टीसाठी एक प्रायव्हेट पार्टी आयोजित केली होती. यावेळी रोहित आणि अजयने केक कापून यशाचा आनंद साजरा केला.
उल्लेखनीय म्हणजे अजयच्या या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला 32.09 कोटींचा व्यवसाय करुन सलमान खानच्या 'किक'ला मागे टाकले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अजयने आयोजित केलेल्या प्रायव्हेट पार्टीची एक्सक्लूझिव्ह छायाचित्रे...