आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: अशाप्रकारे काजोल बनली मिसेस देवगण, पाहा तिचा Wedding Album

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - काजोल आणि अजय देवगण यांच्या लग्नातील एक छायाचित्र)
काजोल आणि अजय देवगण बॉलिवूडमधील सक्सेसफूल कपलपैकी एक आहे. 24 फेब्रुवारी 1999 रोजी हे दोघे लग्नाच्या पवित्र बंधनातच अडकले. अजय-काजोल फिल्म इंडस्ट्रीतील अशी नावे आहेत, जी केवळ त्यांच्या सिनेमांच्या रिलीजवेळी चर्चेत येतात आणि इतर वेळी प्रसिद्धीझोतापासून लांब राहतात. वयाची चाळीशी पूर्ण करणा-या काजोल आणि अजयच्या लग्नाला पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत.
या दोघांचे नाते फिल्मी सेटपासून ते लग्नाच्या मंडपापर्यंत कसे पोहोचले, यामागेच रंजक कहाणी आहे. काजोलने आपल्या प्रेमकहाणीविषयी एका मुलाखतीत सांगितले होते. अजयसोबतचे तिचे लव्ह अॅट फस्ट साइट म्हणजे पहिल्या नजरेतील प्रेम नव्हते. सिनेमाच्या सेटवर भेटल्यानंतर दोघांमध्ये आधी बोलणे सुरु झाले. कमी बोलणा-या अजयसह हळूहळू काजोलची मैत्री वाढत गेली. कालांतराने दोघांमध्ये प्रेम फुलू लागले आणि 1999 मध्ये त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. या दोघांचे लग्न देवगण हाऊसमध्ये पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीने झाले होते.
आज काजोल आणि अजयची जोडी बॉलिवूडमधील बेस्ट जोडींपैकी एक समजली जाते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. युग हे मुलाचे तर न्यासा हे त्यांच्या मुलीचे नाव आहे. कुटुंब आणि मुलांच्या पालनपोषणासाठी काजोलने काही काळासाठी सिनेमांपासून ब्रेक घेतला आहे. आता बातमी आहे, की काही वर्षांच्या ब्रेकनंतर आता काजोल मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अजय आणि काजोलच्या लग्नाचा हा खास अल्बम...