आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी सिनेमात अजय देवगणने साडी नेसण्यास दिला नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: अजय देवगण
तुषार कपूर आणि सबीना खान 'कांचणा' या तामिळ सिनेमाचा रिमेक बनवत आहेत. मात्र अजय देवगणमुळे त्यांना काही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. सिनेमात अजयच्या पात्रात एक ट्रांसजेंडरची आत्मा प्रवेश करते. त्या संबंधित क्लायमॅक्समध्ये अजयला साडी नेसून मेकअप करावा लागणार आहे. मात्र अजयने यासाठी स्पष्ट नकार दिला आहे.
तो म्हणाला, सिनेमाच्या त्या दृश्यात तो साडी नेसणार नाहीये. त्यामुळे आता निर्मांत्यांना पटकथेत आणि लूकमध्ये वेगळा बदल करण्याची गरज पडू शकते. सिनेमा संबंधित एका सूत्राने सांगितले, दिग्दर्शक राघव लॉरेंससुध्दा थोडा गोंधळला आहे. 'क्लायमॅक्समध्ये मंदिराचे एक दृश्य आहे जे सिनेमासाठी महत्वपूर्ण आहे. यामध्ये कांचणा ही स्त्री (ट्रांसजेंडर) आपल्या खूनाचा बदला राघवच्या (अजय)च्या शरीरात प्रवेश करून घेते. अर्थातच राघवला कांचणाचे कपडे परिधान करावे लागणार आहे. सबीना आणि तुषारने अजयला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण अजय त्याच्या निर्णयावर ठाम आहे.'