आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकॉन म्हणणार शाहरूखच्या संघासाठी गाणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आयपीएल-5 चा विजेता संघ कोलकता नाइट राइडर्स संघासाठी नवीन गाणे लिहले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रसिध्द पॉप गायक एकॉन हे गाणे म्हणणार आहे. सध्या केकेआर संघाचे 'कोरबो लोरबो जीत लो' हे गाणे आहे.
एकॉन याने याआधी शाहरूख खानच्या रा-वन चित्रपटातील ' छम्मक छल्लो' म्हटले होते आणि ते जबरदस्त हिट झाले होते. बॉलिवूड स्टार आणि केकेआर संघाचा मालक शाहरूख खानचे म्हणणॆ आहे की, त्याच्यासाठी आयपीएलचा येणारा सीजन फार मोठा आणि चांगला असणार आहे. शाहरूखच्या मते संघाचे नवे गाणे बोल्ड आणि धमाकेदार असणार आहे.
संगीत दिग्दर्शक विशाल ददलानी यांनी सांगितले की, नवीन गाणे 'कोरबो लोरबो जीतलो'चे नवे वर्जन असेल. 'कहानी' चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्यासाठी विशाल याने गाणॆ लिहले होते. केकेआर संघाचे नवीन गाणे एकॉन म्हणणार आहे की नाही याबद्दल जास्त माहित नसल्याचे विशालने सांगितले. एकॉन आणि शाहरूख यांच्याशी मी संपर्कात असल्याचे विशालने सांगितल. पण अजून काहीही अंतिम ठरलेले नाही. सुजाय आणि विशाल यांनी पाच वर्षापूर्वी केकेआरसाठी गाणे कंपोज केले होते. सुजाय यांनी गाण्यात करण्यात आलेल्या बदलाची पुष्टि केली आहे.