ब्रायन सिंगरचा 'एक्स-मॅन: डेज ऑफ फ्यूचर पास्ट' हा सिनेमा भारतात हिट करण्यासाठी दररोज स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात येत आहे. बुधवारी (21 मे) मुंबईच्या सनी सुपर साउंडमध्ये सिनेमाची स्क्रिनिंग ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये बॉलिवूडचे काही स्टार्सची झलक पाहायला मिळाली.
बॉलिवूडचा खिलाडी
अक्षय कुमार पत्नी टिवंकल खन्नासह स्क्रिनिंगला पोहोचला होता. यावेळी तो खूपच आनंदी दिसला. अक्षयने कारमधून आपल्या चाहत्यांना अभिवादनसुध्दा केले. बॉलिवूडची आयटम नंबर मलायका अरोरा खानसुध्दा आपला मुलगा अरहान खानसह स्क्रिनिंगला पोहोचली होती. ती खूपच साध्या लूकमध्ये दिसली. तिने स्लीवलेस टॉप परिधान केलेला होता. मुलाने पांढ-या रंगाचा टी-शर्ट आणि हिरव्या रंगाची जीन्स घातलेली होती. या सर्वांसोबत रितेश देशमुखनेसुध्दा स्क्रिनिंगला हजेरी लावली.
'एक्स-मॅन: डेज ऑफ फ्यूचर पास्टच्या पहिल्या स्क्रिनिंगमध्ये
कतरिना कैफ,
रणबीर कपूर, अयान मुखर्जी, अर्जुन कपूर सामील झाले होते. तसेच, दुस-या स्क्रिनिंगला सुझान रोशन, अर्जुन रामपाल, मेहर, जॅकलीन फर्नांडिस, डीनो मोरियो, साकिब सलीम, पार्थो गुप्ते, प्रतीक बब्बरसह अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती.
'एक्स-मॅन: डेज ऑफ फ्यूचर पास्ट'चे दिग्दर्शन ब्रायन सिंगरने केले आहे. सिनेमाची निर्मिती लॉरेन्स डॉनर, ब्रायन, सायमन किनबर्ग आणि हुच पार्करने केली आहे. सिनेमात ह्यूमा जॅकमॅन, जेम्स मॅकएवॉय, जेनेफर लॉरेन्स, हाले बेरीसह दुस-या स्टार्सनी काम केले आहे. हा सिनेमा 23 मे रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेल्या बी-टाऊनच्या स्टार्सची खास छायाचित्रे...