2002 मध्ये धर्मेश दर्शनच्या दिग्दर्शनामध्ये बनलेला 'हां मैने भी प्यार किया'मध्ये
अक्षय कुमार आणि अभिषेक बच्चनने सोबत काम केले होते. या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला होता. आता निर्माता साजिद नाडियाडवाला अक्षय-अभिषेक जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर आणत आहे. साजिदच्या 'हाऊसफुल-3'मध्ये ही जोडी धमाल उडवताना दिसेल. मागील दोनही 'हाऊसफुल'मध्ये काम केलेले अक्षय आणि रितेश देशमुख तिसर्या चित्रपटात देखील कायम राहणार आहेत. अभिषेकची या चित्रपटासाठी केली गेलेली निवड आश्चर्यकारक मानली जात आहे.
दोन सिनेतार्यासोबत अभिषेकला कॉमेडी करताना पाहणे, हा नवा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा साजिद-फरहाद सांभाळणार आहेत. या जोडीने 'चेन्नई एक्स्प्रेस', 'गोलमाल', 'हाऊसफुल-2', 'बोल बच्चन' आणि 'रेडी'चे संवाद लिहिले आहेत. 'इट्स एंटरटेनमेंट'च्या दिग्दर्शनामध्ये बनणारा हा पहिला चित्रपट असणार आहे.
अक्षय-अभिषेकचा सोबत असणारा हा पहिलाच चित्रपट आहे. मात्र रितेशसोबत दोघांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.