Home | Off Screen | Akshay Kumar and Kareena Kapoor latest news

'सिंग इज ब्लिंग'मध्ये अक्षयसोबत करीना

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jun 04, 2014, 09:45 AM IST

2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कम्बख्त इश्क' या चित्रपटात करीना-अक्षयची जोडी दिसली होती. आता दिग्दर्शक प्रभुदेवा या जोडीला आपल्या 'सिंग इज ब्लिंग' या आगामी चित्रपटात घेण्यासाठी आग्रही असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका करण्यासाठी करीनाशी संपर्कदेखील करण्यात आला आहे. हा दक्षिणेच्या एका चित्रपटाचा रिमेक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

  • Akshay Kumar and Kareena Kapoor latest news
    2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कम्बख्त इश्क' या चित्रपटात करीना-अक्षयची जोडी दिसली होती. आता दिग्दर्शक प्रभुदेवा या जोडीला आपल्या 'सिंग इज ब्लिंग' या आगामी चित्रपटात घेण्यासाठी आग्रही असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका करण्यासाठी करीनाशी संपर्कदेखील करण्यात आला आहे. हा दक्षिणेच्या एका चित्रपटाचा रिमेक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
    प्रभदेवाने सुरुवातीला या चित्रपटाची कथा लिहिली असून त्यामध्ये अभिनेत्रीसाठी उत्कृष्ट भूमिका आहे. याबाबत प्रभुदेवाने सांगितले की, 'चित्रपटातील अभिनेत्री म्हणून कोणाची निवड करायची, हे निर्माते ठरवतील.' लवकरच अभिनेत्रीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. चित्रपट निर्माती अश्विनी यार्दीने सांगितले की, 'आता याबाबत काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. या महिन्याच्या शेवटपर्यंत चित्रपटात नायिका कोण असेल याबाबतची आम्ही घोषणा करू.'

Trending