आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयसोबत जमली शिल्पाचा नवरा राजची गट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मैं खिलाड़ी तू अनाड़ी’, ‘जानवर’, ‘इंसाफ’ आणि ‘धड़कन’ यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र झळकलेले माजी प्रियकर-प्रेयसी अर्थातच अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी आता आपापसातील कटुता विसरलेले आहेत. या दोघांच्या ब्रेकअपवेळी शिल्पा अक्षयविरोधात बरेच काही उलटसुलट बोलली होती.
आता ती मिसेस राज कुंद्रा आहे आणि तिला एक दोन वर्षांचा मुलगासुद्धा आहे. तर अक्षयनेदेखील ट्विंक खन्नासह संसार थाटला असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या घरी झालेल्या एका पार्टीत शिल्पाची केवळ अक्षयसोबतच नव्हे तर ट्विंकलसुद्धा मैत्री झाल्याचे समजते.
आता बातमी आहे, की राज कुंद्रा यांनीही हसत अक्षयची भेट घेतली. माजी प्रियकरासोबत येत असलेल्या बातम्यांविषयी शिल्पाचे म्हणणे आहे, की आम्ही दोघेही आता आपापल्या आयुष्यात खूप पुढे गेलो आहोत.
अक्षयसोबत झालेल्या भेटीविषयी राज कुंद्रा म्हणतात, ''लग्नापूर्वीच मला शिल्पाच्या भूतकाळाविषयी माहित होते. आज ती माझी पत्नी आणि माझ्या मुलाची आई आहे. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणने इंडस्ट्रीतील परिस्थिती बदलली, असे मी म्हणेल. आता येथे माजी प्रियकर-प्रेयसी आपल्या मनात एकमेकांविषयी कटुता ठेवत नाही, उलट मैत्रीचा हात पुढे करतात.''