आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Kumar And Tamannaah Bhatia Walk With Dogs In A Fashion Show In Bangalore

अक्षय-तमन्ना Dogsसह अवतरले रॅम्पवर, पाहा स्टार्सच्या कॅटवॉकची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रॅम्पवर डॉग्ससह कॅटवॉक करताना अक्षय कुमार)
मुंबई: बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थातच अक्षय कुमार त्याच्या 'एन्टरटेन्मेंट' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बराच बिझी असल्याचे दिसून येत आहे. या सिनेमात त्याच्यासह काम करणारी अभिनेत्री तमन्ना भाटियासुध्दा त्याला प्रमोशनमध्ये साथ देताना दिसत आहे. दोघांनी सोमवारी (4 ऑगस्ट) बंगळूरुमध्ये आयोजित एका फॅशन शोमध्ये सहभाग घेतला होता.
या फॅशन शोचे खास वैशिष्टे म्हणजे, अक्षय आणि तमन्ना यांनी रॅम्पवर डॉगींसह कॅटवॉक केला. तमन्ना रॅम्पवर चालताना दोन्ही हातात दोन डॉगी घेऊन आली होती. ती घेऊन आलेल्या डॉगींनी जे कपडे परिधान केलेले होते, ते रमेश डेम्बला यांनी डिझाइन केले होते. तसेच अक्षय कुमारसुध्दा दोन डॉगींसह रॅम्पवर अवतरला होता. इव्हेंटमध्ये इतर मॉडेल्सनीसुध्दा डॉगींसह रॅम्प वॉक केला. या इव्हेंटमध्ये सिनेमाचे निर्माते रमेश तौराणीसु्ध्दा दिसून आले.
'एन्टरटेन्मेंट' एक कॉमेडी सिनेमा असून त्यामध्ये मिथुन चक्रवर्ती, कृष्णा अभिषेक, जॉनी लिव्हर, प्रकाश राज, सोनू सुदसुध्दा दिसणार आहे. दिग्दर्शक म्हणून साजिद-फरहाद यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. हा सिनेमा येत्या 8 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे.
Dogsसह रॅम्पवर अवतरलेल्या अक्षय आणि तमन्नाची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...