आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wedding Photos Of Bollywood Actor Akshay Kumar And Twinkle Khanna

Wedding Anniversary: स्वतःच्याच लग्नात बेभान होऊन थिरकला होता अक्षय कुमार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अक्षय कुमार-टि्वंकल खन्ना यांच्या लग्नाचा एक फोटो)
मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या लग्नाला आज 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. 17 जानेवारी 2001 रोजी अक्षय-ट्विंकल लग्नगाठीत अडकले होते. ट्विंकल सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची लेक आहे. अक्षयने लग्नात पांढ-या रंगाची शेरवानी आणि टि्वंकलने साडी स्टाइल लाल रंगाचा लहंगा परिधान केलेला होता. अक्षयने गळ्यात नोटांची माळ घातलेली होती. लग्नात दोघांनी एकमेकांसोबत खूप डान्स केला होता.
लग्नापूर्वी अक्षय आणि ट्विंकल यांचे दीर्घकाळ अफेअर होते. असे म्हटले जाते, की अक्षयची ट्विंकलसोबत लग्न करण्याची इच्छा नव्हती. मात्र ट्विंकलची आई डिंपल यांच्या दबावापुढे अक्षयला हार मानावी लागली आणि अखेर दोघांचे लग्न झाले.
दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी असून आरव आणि नितारा ही त्यांची नावे आहेत. लग्नानंतर अक्षय आणि ट्विंकलचे संबंध सुधारले आणि आज दोघेही आनंदी वैवाहिक आयुष्य व्यतित करत आहेत. आपल्या 14व्या वेडिंग अॅनिव्हर्सरीनिमित्त अक्षयने फेसबुक पेजवर लिहिले, "After 14 years of listening to the same old jokes I still wait to hear more !"
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अक्षय-टि्वंकलच्या लग्नाची निवडक छायाचित्रे...

(छायाचित्रे साभार http://www.akshay-online.net)