आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Kumar First Time The Japanese Martial Art Aikido In \'Baby\'

INTERVIEW : \'बेबी\'मध्ये पहिल्यांदाच केला जापानी मार्शल आर्ट \'आयकिडो\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सिनेमातील एका दृश्यात अक्षय कुमार)
मुंबईः बॉलिवूडमध्ये आज प्रत्येक हीरो अॅक्शन सिनेमे करतोय. मात्र अक्षय बॉलिवूडचा असा एकमेव अभिनेता आहे, जो स्वतःचे अॅक्शन सीन्स स्वतः करतो. कदाचित यामुळेच त्याचा बॉलिवूडचा 'खिलाडी' म्हटले जाते. अक्षय 23 जानेवारी रोजी रिलीज होत असलेल्या निरज पांडे दिग्दर्शित 'बेबी' या सिनेमात झळकणार आहे. 'बेबी' हा एक इश्यू बेस्ड सिनेमा आहे. मात्र या सिनेमात बॉलिवूडच्या इतर मसाला सिनेमांप्रमाणे दिखावा नसणारेय. सिनेमात एकही आयटम नंबर नाहीये, शिवाय सुंदर लोकेशन्सवर हीरो हिरोईनसोबत रोमान्सही करताना दिसणार नाहीये. 'अ वेनस्डे' आणि 'स्पेशल 26' या सिनेमांचे दिग्दर्शक नीरज पांडे हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा घेऊन आले आहेत. दहशतवादावर आधारित या सिनेमाचे कथानक आहे.
दहशतवाद कशाप्रकारे जागतिक प्रश्न बनत चालला आहे, हे या सिनेमात अधोरेखित करण्यात आले आहे. एक सामान्य माणूस दहशतवादाशी कसा सामना करतो आणि सरकार त्याला कशाप्रकारे सुरक्षा पुरवते, हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. हा एखादा अँटी पाकिस्तानी सिनेमा नाहीये. सिनेमात जिहादीची भूमिका पाकिस्तानी अभिनेता राशिद नाजने साकारली आहे.
बेबी या सिनेमा अक्षय कुमारने भारतीय गुप्तहेर अजय सिंह राजपूतची भूमिका साकारली आहे. तो मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये कवर्ट काउंटर इंटेलिजन्स यूनिटचा सदस्य असतो. सिनेमात अक्षयसह डॅनी डेंजोग्पा, अनुपम खेर, के.के. मेनन आणि राना डग्गुबत्ती यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
dailybhaskar.comने काही दिवसांपूर्वी मुंबईत पार पडलेल्या बेबी सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी अक्षय कुमारसोबत बातचित केली. त्याच मुलाखतीचा हा भाग...
प्रश्नः 'बेबी' हा सिनेमा इश्यू बेस्ड आहे आणि 2015ची सुरुवात या धाटणीच्या सिनेमाने होतेय. या सिनेमाकडून काय अपेक्षा आहेत. ट्रेड पंडितांच्या मते 'बेबी' मोठा सिनेमा असून शंभर कोटींपेक्षा अधिक व्यवसाय करेल?
उत्तरः सध्या माझ्या अपेक्षा बॉक्स ऑफिसवरील बिझनेसकडून मुळीच नाहीयेत. इतर मसालापटांप्रमाणे या सिनेमाने लवकरात लवकर शंभर कोटींचा गल्ला न जमवता केवळ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करावे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. लोकांनी आणि समीक्षकांनी सिनेमाविषयी भरपूर चर्चा करावी. पोलिस, लष्कर, एअरफोर्स आणि नेव्हीतील ऑफिसर्स मोठे काम करतात. त्यांना परमवीर चक्र, मेडल देऊन सन्मानित केले जाते. मात्र असेही अनेक लोक आहेत, जे स्पाय (गुप्तहेर) किंवा एजंट असतात. ते दहशतवादाला आळा घालण्यासाठी गुपचुप पद्धतीने कार्य करत असतात. ते अनेक मोठी कामे करतात. मात्र त्यांच्या कुटुंब किंवा शेजा-यांनासुद्धा त्यांच्या कामाविषयी कल्पना नसते. याविषयी सिनेमात सांगण्यात आले आहे.
पुढे वाचा, बेबी सिनेमाविषयी आणखी काय-काय म्हणाला अक्षय कुमार...