आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड \'खिलाडी\'ने घरीच साजरी केली संक्रात, मुलीसोबत लुटला पतंगबाजीचा आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुलगी नितारासोबत पतंग उडवताना अक्षय कुमार)
मुंबई- बुधवारपासून (14 जानेवारी) मकर संक्रातीचा उत्साह सर्वत्र दिसून येत. आकाशात रंगबेरंगी पतंग उडतानासुध्दा दिसत आहेत. बॉलिवूडसुध्दा या सणामध्ये सामील झाले आहे. महानायक आमिताभ बच्चन अहमदाबादमध्ये तर मल्लिका शेरावत जयपूरमध्येमध्ये पतंग उडवताना दिसली. तसेच, अक्षय कुमारने मुंबईमध्ये आपल्या घरी पतंगबाजी केली. त्याने मुलगी नितारा कुमारसोबत पतंग उडवण्याचा आनंद घेतला.
त्याने मकर संक्रांती सेलिब्रेशनचे फोटो सोशल साइट्सवर शेअर केले आहेत. त्याने फोटो शेअर करून लिहिले, 'सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मुलीसोबत पतंग उडवण्यात आनंद वाटला. परंतु मुलाची आठवण येतेय. तो सध्या शाळेच्या सहलीत गेला आहे.' अक्षयला मुलगी नितारा आणि मुलगा आरव अशी दोन आपत्ये आहेत. त्याची पत्नी टि्वंकल खन्नाने 2012मध्ये निताराला जन्म दिला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुलगा आरवसोबत अक्षयची छायाचित्रे...