आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अक्षय कुमारचे 'अच्छे दिन जाने वाले हैं!'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
23 जानेवारी 2015 रोजी बॉक्स ऑफिसवर अभिनेता अक्षय कुमारचे दोन सिनेमे समोरासमोर येणार आहेत. जर त्याने आपल्या एका सिनेमाची रिलीज डेट लांबणीवर टाकली, तर त्या सिनेमाचा सामना एका मल्टिस्टारर सिनेमाशी होईल, ज्यामुळे त्याला तोटा सहन करावा लागू शकतो.
अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला आणि नीरज पांडे दिग्दर्शित 'बेबी' आणि गेल्या वर्षभरापासून तयार होत असलेला 'गब्बर', हे दोन सिनेमे पुढील वर्षी 23 जानेवारीला रिलीज होणार आहेत. अक्षयचे एकाचवेळी दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल झाले, तर प्रेक्षकांची विभागणी निश्चित आहे. त्याचा परिणाम सिनेमाच्या व्यवसायावर होईल.
इतकेच नाही तर निर्माता फिरोज नाडियाडवाला यांनी त्यांच्या मल्टिस्टारर 'वेलकम बॅक'साठीसुद्धा 23 जानेवारीचाच मुहूर्त शोधून काढला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'हेरा फेरी' सीरिजच्या तिस-या सिनेमात आणि 'वेलकम' सीरिजचा दुसरा सिनेमा 'वेलकम बॅक' या सिनेमात अक्षयने काम करण्यास नकार दिला होता. तेव्हापासून निर्माता फिरोज आणि अक्षय यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली. अक्षयने साजिदकडे अशा काही अटी ठेवल्या होत्या, ज्या फिरोज यांना मान्य नव्हत्या.
फिरोज नाडियाडवाला यांच्या 'वेलकम बॅक'मध्ये जॉन अब्राहम, अनिल कपूर, श्रुती हसन आणि
नाना पाटकेर मेन लीडमध्ये आहेत. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. अक्षयला धडा शिकवण्यासाठी फिरोज यांनी आपल्या सिनेमासाठी 23 जानेवारी 2015चा मुहूर्त शोधून काढल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
असो, मागील दोन फ्लॉप सिनेमांनंतर अक्षयला 'हॉलिडे'मुळे यशाची चव चाखायला मिळाली. मात्र येणारा काळ त्याच्या सिनेमांसाठी कठीण आहे, असेच चित्र सध्या तरी तयार झाले आहे. कारण जर सिनेमांची रिलीज डेट बदलण्यात आली नाही, तर अक्षयच्या सिनेमाला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.