बॉलिवूड खिलाडी
अक्षय कुमारने 'फुगली' या थ्रिलर सिनेमाची निर्मिती केली आहे. 'फुगली'चा फस्ट लूक काल (7 एप्रिल) अक्षय कुमार आणि त्याची सहनिर्माती अश्विनी यांच्या उपस्थिती रिलीज करण्यात आला. ब़ॉक्सर
विजेंदर सिंह, सोनम कपूरचा चुलत भाऊ मोहित मारवाह आणि किरण अडवाणी हे या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. जिमी शेरगिलसुध्दा सिनेमात असून तो नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
देव, देवी, गौरव आणि आदित्य या चार दिल्लीच्या मित्रांची कहाणी सिनेमात रेखाटण्यात आली आहे. या चारही मित्रांचे कॉलेज पूर्ण झाल्यानंतर करिअर घडवण्याचे स्वप्न असते. परंतु त्यांच्यासोबत असे काही घडते ज्याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता.या सिनेमाचा ट्रेलरवरून फरहान अख्तर निर्मित 'फुकरे'च्या सिनेमाची काहीप्रमाणात आठवण होते. त्यामध्येसुध्दा चार मित्रांची कहाणी रेखाटण्यात आली होती.
'फुगली'ची रिलीज डेट अद्याप ठरलेली नाहीये. परंतु 16 मे रोजी हा सिनेमा रिलीज होणार असल्याचे सांगितले जात होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'फुगली' सिनेमाच्या फस्ट लूक रिलीजची काही खास छायाचित्रे....