आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Kumar Left Controversy With Raveena Tandon

रविनासोबतच्या मतभेदांना अक्षयने दिली तिलांजली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षयकुमार आपल्या जुन्या प्रेयसीसोबतचे मतभेद विसरून आगेकूच करत आहे. काही दिवसांपूर्वी तो शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राशी भेटला होता. नुकतेच 'फग्ली' सिनेमाच्या ट्रेलर लाँचनंतर तो अनिल थडाणींना भेटला. अनिल अभिनेत्री रविना टंडनचा पती आहे. 90च्या दशकात रविना आणि अक्षयच्या प्रेमसंबंधांबतच्या कथा चर्चेत होत्या.
इतक्या की, दोघांच्या प्रेमसंबंधामध्ये फूट पडल्यानंतर रविनाने नैराश्यात येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या अक्षय आणि रविनाने वेगवेगळ्या जोडीदारांसोबत विवाह करून आपापले संसार थाटले आहेत. अक्षय वडील, तर रविना आई बनली आहे. आता हे जुने नाते व्यावसायिक नात्यांमध्ये बदलत चालले आहे. थडाणींचा चित्रपट वितरणाचा व्यवसाय आहे. अक्षयच्या 'फग्ली' चित्रपटाचे भारतातील वितरण थडाणींकडेच आहे. म्हणजे चित्रपटाच्या स्क्रीनिंगपासून ते सक्सेस पार्टीपर्यंत हे माजी प्रेमी जोडपे एकमेकांसमोर राहील.