आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akshay Kumar Meet With Child Artist Of 72 Miles Ek Pravas

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'72 मैल एक प्रवास'च्या बालकलाकारांनी अनुभवला 'अक्षययोग' !!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आपल्या दमदार अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये सुपरस्टार बनलेला अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. अभिनेता म्हणून अक्षयची इनिंग सुपर फॉर्ममध्ये असताना अक्षयने निर्मितीची इनिंग सुरु केली. अश्विनी यार्दीसह अक्षयने हिंदीत 'ओह माय गॉड' या सिनेमाची निर्मिती केली. हिंदीमध्ये यश मिळाल्यानंतर अक्षयने निर्माता म्हणून आता आपली नवीन कलाकृती मराठी सिनेरसिकांच्या भेटीला आणली आहे. येत्या 9 ऑगस्टला अक्षयची पहिली मराठी निर्मिती असलेला '72 मैल एक प्रवास' हा सिनेमा रिलीज होणार आहे.

या सिनेमाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. तशीच काहीशी उत्सुकतचा सिनेमाच्या टीममध्ये होती ती अक्षय कुमारला भेटण्याबद्दलची. विशेषतः सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असलेली चारही मुलं अक्षयला भेटण्यासाठी अतिशय उत्सुक होती. त्यांची हीच उत्सुकता लक्षात घेऊन अक्षयने या मुलांना भेटायचं ठरवलं.

सिनेमातील चारही मुलं म्हणजे चिन्मय संत, श्रावणी केळुसकर, चिन्मय कांबळी आणि ईशा माने यांना हे कळताच त्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली. अक्षयने दिलेल्या वेळेनुसार ही मुले मुंबईत पोहोचली. यात चिन्मय संत पुण्याहून, श्रावणी आणि ईशा साता-याहून आणि चिन्मय बोरीवलीहून सांताक्रूझला पोहोचले.

मुंबईतील सांताक्रूझमध्ये अक्षयने या चारही मुलांची भेट घेतली. अक्षयला भेटून या चारही मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. विशेष म्हणजे अक्षय कुमार त्यांना भेटल्यानंतर हिंदी किंवा इंग्रजीत बोलेल असं या मुलांना वाटलं होतं. मात्र मुलांना भेटताच अक्षयने कसे आहात तुम्ही... ? असं अस्खलीत मराठीत विचारुन त्यांच्याशी मराठीतून संवाद साधला. हे बघून मुलांना आश्चर्याचा धक्का बसला.

सिनेमातील भूमिकेपासून ते परिक्षेत मिळालेल्या गुणांबद्दल अक्षयने या मुलांची विचारपूस केली. मुलांनीही त्याच्याशी आनंदाने संवाद साधला. अक्षयचे आवडलेले सिनेमे, भूमिका याबद्दलच्या गप्पा मुलांनी त्याच्याबरोबर मारल्या.
'72 मैल एक प्रवास' या सिनेमासाठी आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊन अक्षयने मुलांचा निरोप घेतला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा अक्षयची या बालकलाकारांबरोबरची खास छायाचित्रे..