आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Kumar Records A Song Live At A Promotional Event

प्रमोशनसाठी अक्षय बनला गायक, रेकॉर्डिंगमध्ये दिसले डिफरंट Expressions

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाणे रेकॉर्ड करताना अभिनेता अक्षय कुमार
मुंबई: अक्षय कुमारचा 'इट्स एंटरटेनमेंट' हा आगामी सिनेमा आहे. त्याचा मागील 'हॉलिडे' सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्यामुळे या सिनेमाकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हा सिनेमा हिट करण्यासाठी तो सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी झाला आहे. अक्षय बुधवारी (23 जुलै) मुंबईच्या जोगेश्वरी स्टुडिओमध्ये पोहोचला होता. त्याने सिनेमाचे टायटल साँग स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड केले आहे. हे गाणे प्रमोशनसाठी यू-ट्यूबरवर अपलोड करण्यात येणार आहे.
अक्षयने यापूर्वूसुध्दा सिनेमाच्या प्रमोशनसाठी हा फंडा वापरला आहे. त्याने 'स्पेशल 26' सिनेमाचे 'मुझे में तू' हे गाणे रेकॉर्ड करून यू-ट्यूबवर अपलोड केले होते. अक्षयचा हा अंदाज लोकांच्या पसंतीस पडला होता. सिनेमाचे गाणे रेकॉर्ड केल्यानंतर अक्षयने तमन्ना भाटियासह सिनेमाचे प्रमोशन केले होते. 'इट्स एंटरटेनमेंट' हा एक कॉमेडी सिनेमा आहे. त्यामध्ये अक्षयसह मिथून चक्रवर्ती, कृष्णा, अभिषेक, जॉनी लिव्हर, प्रकाश राज, सोनू सुदसुध्दा दिसणार आहे. सिनेमात अक्षयच्या पात्राचे नाव अखिल आणि तमन्नाच्या पात्राचे नाव साक्षी आहे.
सिनेमा साजिद-फरहान दिग्दर्शित करत आहे. या जोडीचा हा पहिला एकत्र सिनेमा आहे. दोघांनी अनेक कॉमेडी सिनेमनांच्या पटकथा लिहिल्या आहेत. 8 ऑगस्ट रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अक्षय कुमारच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगची छायाचित्रे...