आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 लाखाच्या जॅकेटचे अक्षयने दिले तब्बल साडे तीन लाख रुपये, तमन्नाही दिसली सोबत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तमन्ना भाटिया आणि अक्षय कुमार
मुंबई: शनिवार (2 ऑगस्ट) बॉलिवूडचा खिलाडी अर्थातच अक्षय कुमारने जॅकेट खरेदी केले. या जॅकेटची किंमत 1 लाख रुपये होती मात्र त्याने यासाठी 3,60,000 रुपये दिले. असे त्याने स्वत:साठी नव्हे एका चॅरिटीसाठी केले. शनिवारी चॅरिटी शोचा भाग बनण्यासाठी अक्षय ओशिवारा, अंधेरी (पश्चिम) परिसरात वुडसाइड ऑल डे अँड इटेरीला पोहोचला होता.
हा इव्हेंट वर्षा तौराणी यांच्या वतीने चालवण्यात येणा-या 'यूथ ऑर्गनायजेशन फॉर डिफेन्स ऑफ अ‍ॅनिमल' (YODA)ला सपोर्ट करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी अक्षयसह सिनेमाची अभिनेत्री तमन्ना भाटिया, दिग्दर्शक साजिद फरहाद आणि निर्माता रमेश तौराणीसुध्दा उपस्थित होते.
YODAविषयी सांगताना अक्षयने सांगितले, 'YODAसारख्या संस्था नेहमी भटकणा-या श्वानांची काळजी घेते. मला आनंद आहे, की 'एंटरटेनमेंट'मध्ये आम्ही परिधान केलेले कपडे वाया जाणार नाहीत. ते सर्व विकल्या जातील जे पैसे मिळतील ते YODAला दिले जाणार आहे.'
अक्षयने तिथे लावण्यात आलेल्या प्रदर्शनामधून एक जॅकेट खरेदी केले. तसेच त्याने सिनेमाचे प्रमोशन केले. अक्षयचा 'एंटरटेनमेंट' हा सिनेमा येत्या 8 ऑगस्टला रिलीज होत आहे. सिनेमात अक्षय आणि तमन्ना यांच्याव्यतिरिक्त प्रकाश राज, सोनू सुद आणि मिथुन चक्रवर्तीसुध्दा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या संस्थेच्या इव्हेंटची काही छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...