आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, अक्षयच्या सिनेमांच्या निर्मात्यांमध्ये का आहे नाराजी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ए वेडन्सडे' आणि 'स्पेशल 26'सारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केल्यानंतर नीरज पांडे आपल्या आगामी सिनेमावर काम करण्यास सुरू करणार आहे. त्याच्या या सिनेमात अक्षय कुमारची मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा संजय लीला भन्साळी यांच्या बॅनरच्या 'गब्बर' सिनेमासोबत रिलीज होणार आहे. त्यामध्येसुध्दा अक्षयचीच मुख्य भूमिका आहे. या दोन्ही सिनेमांपैकी कुणीच पुढील वर्षीची 26 जानेवारीची तारिख सोडण्यास तयार नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. संजय भन्साळी यांच्या जवळच्या सुत्राने सांगितले, 'आम्ही निर्णय घेतला होता, की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 'गब्बर'ला प्रदर्शित करणे ठिक राहिल. तीन महिन्यांपूर्वीच आम्ही हा निर्णय घेतला होता. या सिनेमाची संकल्पना सामाजिक आणि राजकिय विषयावर आधारित असून सिनेमाची कहाणी एका व्यक्तिचा भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा असलेली आहे. काही दिवसांपासून मसाला आणि एडव्हेंचर सिनेमे करणारा अक्षय आता देशांत चालू असलेल्या मोठ्या मुद्याला पडद्यावर दाखवणार आहे. आता असा सिनेमा रिलीज होण्यासाठी 26 जानेवारीपेक्षा दुसरा कोणता दिवस चांगला आहे. आम्हाला हे जाणून घेण्याची उत्सूकता आहे, की सिनेमाचा एकही दृश्य चित्रीत न करता दुस-याच्या रिलीज डेटवर आपला सिनेमा रिलीज करण्याची घोषणा कशी केली जाऊ शकते.'
आता भन्साळी या गोष्टीमुळे नाराज आहे, की या तारखेचा विचार नीरज पांडेच्या डोक्यात का आला आहे? त्यांच्या एका जवळच्या सुत्राने सांगितले, 'नीजर पांडेनी आपल्या सिनेमाचा एक दृश्यदेखील शुट केलेला नाहीये तर त्यांनी या तारिखेवर सिनेमा रिलीज करण्याता विचारच कसा केला. ही खूपच गैर बाब आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या ठरलेल्या तारिखेवर सिनेमा रिलीज करणार आहोत. '
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून नीरज पांडेचे अक्षय कुमार अभिनीत आगामी सिनेमाविषयी काय मत आहे?