आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay, Twinkle And Other Stars At 'Entertainment' Screening

'एंटरटेनमेंट'च्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये पत्नी आणि मुलासह पोहोचला अक्षय, पाहा खास Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय कुमार आणि त्याची पत्नी टि्वंकल खन्ना
मुंबई: मुंबईमध्ये काल (2 ऑगस्ट) अर्थातच अक्षय कुमार 'एंटरटेनमेंट' या आगामी सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. जुहू परिसरातील सनी सुपर साऊंडमध्ये ठेवलेल्या या स्क्रिनिंगमध्ये अक्षय कुमार पत्नी टि्वंकल खन्ना आणि मुलगा आरवसह पोहोचला होता. तसेच, टीव्ही जगातील प्रसिध्द होस्ट आणि बॉलिवूड अभिनेता मनीष पॉलसुध्दा दिसला. यादरम्यान अक्षय कुमारची बहीण अलका भाटियासुध्दा पोहोचली होती.
साजिद-फरहाद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा सिनेमा 8 ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. सिनेमाची कहानी एका डॉगीवर आधारित आहे. (डॉगीचे नाव एंटरटेनमेंट आहे.)
हा एक कॉमेडी सिनेमा आहे. त्यामध्ये अक्षय कुमारव्यतिरिक्त तमन्ना भाटिया, मिथुन चक्रवर्ती, सोनू सुद, जॉनी लिव्हर, प्रकाश राज, कृष्णा अभिषेक आणि हितेश तेजवानी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. याव्यतिरिक्त रितेश देशमुखसुध्दा या सिनेमात कॅमियो भूमिकेते आहे. रमेश तौराणी आणि जयंतलाल गडा यांनी सिनेमा निर्मित केला आहे.
स्पेशल स्क्रिनिंगवेळी कोण-कोणते स्टार्स दिसले, पाहा पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...