आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन \'शौकीन\'मध्ये अक्षय सुपरस्टारच्या भूमिकेत, हनीसिंगचे असेल हिट नंबर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'शौकीन' सिनेमामध्ये सतत बदल होत आहेत. सुरूवातीला अक्षय कुमारची भूमिका एक सामान्य व्यक्तीची होती. परंतु आता तो सुपरस्टार होणार आहे. त्याच्यावर तीन गाणी चित्रीत करण्यात येणार आहेत. त्यामध्ये हनीसिंगसुध्दा एक हिट नंबर तयार करणार आहे.
मुंबई: सुरूवातीपासूनच 'शौकीन'च्या स्टार्ससाठी अनेक अडचणी येत आहेत. बासु चॅटर्जी दिग्दर्शित हा सिनेमा 1982मध्ये आला होता. याच्या रिमेकचे दिग्दर्शन सुरूवातीला रुमी जाफरी करणार होता. परंतु काही मतभेदांनंतर तो या सिनेमापासून वेगळा झाला. आता 'तेरे बिन लादेन' फेम अभिषेक शर्माचा यात प्रवेश होणार आहे. तीन जेष्ठ भूमिक बोमन ईराणी, अन्नू कपूर आणि परेश रावल यांना देण्याचा निर्णय झाला होता. परंतु बोमन ईराणी आणि परेश रावल या सिनेमातून वेगळे झाले. त्यांची जागा पियूष मिश्रा आणि अनूपम खेर यांनी भरून काढली आहे. त्यानंतर नर्गिस फाखरीने शुटिंग सुरू होण्याच्या 15 दिवस आधी सिनेमा सोडला.
अक्षय कुमारने तिची जागा भरून काढण्यासाठी श्रध्दा कपूर आणि यामी गौतमी यांचे ऑडिशन घेण्यात आले. परंतु 'क्वीन'ची विजयलक्ष्मी अर्थातच लीजा हेडन सिनेमाची नायिका बनली. सिनेमाची शुटिंग सुरू होण्याच्या आठवड्याभरापूर्वी सुत्रांनी सांगितले, नर्गिसने अचानक सिनेमा सोडून गेल्यानंतर अक्षयने हा सिनेमा खूप मनावर घेतला आहे आणि तो आता सिनेमाच्या स्टार्सविषयी सावध झाला आहे. हा सिनेमा हिट करण्याचा तो प्रत्येक प्रयत्न करत आहे. या रिमेकच्या सिनेमाची शुटिंग अक्षय पहिले 12 दिवस करणार होता. परंतु आता त्याची भूमिका बदलल्यामुळे तो 20 दिवसांची शुटिंग करणार आहे. अ‍ॅक्श सिनेमांची शुटिंग 50 दिवसांमध्ये पूर्ण करणारा अक्षय रोमँटिक सिनेमा 20 दिवसांची शुटिंग करून स्वत: खात्यात सिनेमाचा 65 टक्के भाग घेणार आहे. त्याची या सिनेमा एक कॅमियो भूमिका नसून तोसुध्दा सिनेमाचा एक भाग आहे.
मुळ 'शौकीन' सिनेमात नायिकेच्या प्रियकराची भूमिका मिथून चक्रवर्ती यांनी एक सामान्य व्यक्तीच्या रुपात साकारली होती. परंतु अक्षय कुमार सध्याच्या काळातील तरुणांनुसार सुपरस्टारची भूमिका साकारणार आहे. हा बदल मागील काही दिवसांपूर्वी शुटिंग सुरू होण्याच्यादरम्यानच करण्यात आला होता.
आता अक्षयवर तीन गाणीसुध्दा चित्रीत करण्यात येणार आहे. याची योजना सुरूवातीला नव्हती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयचा आवडता आणि लकी फॅक्टर हनीसिंगसुध्दा सिनेमाचा भाग म्हणून लवकरच समोर येणार आहे. सुपरस्टार बनून अक्षयसुध्दा हनीसिंगच्या स्टाइलमध्ये रॅपिंग करणार आहे. सिनेमाची शुटिंग सध्या मुंबई आणि पुढील आठवड्यात दिल्लीमध्ये होणार आहे.
नोट: नर्गिसने हा सिनेमा सोडल्यानंतर अक्षयने हा सिनेमा कर्मिशिअल प्रतिष्ठीत करण्याचा प्रश्न तयार केला आहे.