आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akshay’S Holiday Makes 150 Crores Worldwide At Box Office

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

15 दिवसांत 'हॉलिडे'ने कमावले 150 कोटी, 'हमशकल्स'चा व्यवसाय 40 कोटींच्या वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हमशकल्स' सिनेमाचे पोस्टर
मुंबई - अक्षय कुमार स्टारर 'हॉलिडे' या सिनेमाने केवळ भारतातच नव्हे तर ओवरसीजमध्येही चांगला बिझनेस केला आहे. त्यामुळे या सिनेमाची गणना यावर्षी ओवरसीजमध्ये चांगला व्यवसाय करणा-या सिनेमांमध्ये होऊ लागली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे समीक्षकांनी नाकारलेल्या 'हमशकल्स' या सिनेमानेसुद्धा पहिल्या विकेंडपर्यंत 40 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे टीकाकारसुद्धा हैरान आहेत.
अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'हॉलिडे'ने रिलीजच्या 15 दिवसांत 150 कोटींचा व्यवसाय केला आहे. ब-याच काळानंतर अक्षय कुमारच्या एखाद्या सिनेमाला ओवरसीजमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सिनेमाने केवळ युएईमध्येच नव्हे तर पाकिस्तानमध्येही चांगले यश मिळवले. मुरुगदास दिग्दर्शित 'हॉलिडे' या सिनेमाने ओवरसीजमध्ये यावर्षी रिलीज झालेल्या '2 स्टेट्स', 'हंसी तो फंसी' आणि 'गुंडे' या सिनेमांच्या तुलनेत जास्त यश मिळवलं आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या टीका होऊनसुद्धा 'हमशकल्स'ने कसा जमवला एवढा गल्ला...