आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

को-स्टार 'डॉगी' झाला अक्षयचा मित्र, फावल्या वेळेत त्याच्यासह करतो मस्ती!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'इट्स एंटरटेनमेंट'च्या सेटवर डॉगीसह अक्षय कुमार
अभिनेता अक्षय कुमारविषयी सांगितले जात आहे, की तो सेटवर खूप धमाल-मस्ती करतो. मात्र कामाच्या वेळी खूप गंभीर असतो. अक्षयविषयी त्याची को-स्टार कतरिना कैफने एकदा सांगितले होते, 'अक्षय आणि मी एकसारखेच आहोत. आम्ही सेटवर खूप धमाल करतो. परंतु पॅकअप होताच सरळ घरी जातो.'
पण हे चित्र जरा उलटे झाले, कारण अक्षयला एक नवीन मित्र झाला आहे. ज्याच्यासोबत तो शुटिंगनंतर वेळ घालवतो. हा मित्र दुसरा-तिसरा कुणी नाही तर एक डॉगी आहे. हा डॉगी अक्षयसह आगामी 'इट्स एंटरटेनमेंट' सिनेमात दिसणार आहे.
आपल्या नवीन मित्राविषयी अक्षय म्हणतो, 'या डॉगीचे सिनेमात एंटरटेनमेंट नाव आहे. शुटिंगदरम्यान आमच्यात चांगली मैत्री झाली आहे. ऑफ कॅमेरा मी त्याच्यासह बराच वेळ घालवतो. आम्ही एकमेकांचे को-स्टार नव्हे मित्र म्हणून राहतो. ब्रेक झाल्यानंतर आम्ही एकत्र आराम करतो. त्याला माझ्यासह टेनिस खेळणे खूप आवडते.'
अक्षयच्या सांगण्याप्रमाणे, असा डॉगी प्रत्येकाच्या घरात असायला हवा. या डॉगीसह मैत्री करण्यापूर्वी अक्षयच्या घरात अनेक पाळीव श्वान आहेत. मुंबईच्या घरी दोन शेफर्ड डॉग आहेत. त्यांचे नाव Oaky आणि Clio आहे. गोव्याच्या घरीसुध्दा एक गोल्डन लेब्राडॉर आहे. त्याच्या आईकडेसुध्दा एक डॉगी आहे.