('द शौकीन्स' या सिनेमातील 'मैं अल्कोहोलिक हूं' या गाण्यात अक्षय कुमार आणि लीसा हेडन)
मुंबईः 'द शौकीन्स' हा सिनेमा शुक्रवारी मोठ्या पडद्यावर अवतरतोय. या सिनेमाते ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहेत.
अक्षय कुमार आणि लीसा हेडनची केमिस्ट्री प्रेक्षकांना या सिनेमात बघायला मिळणार आहे. या सिनेमातील गाणीसुद्धा प्रेक्षकांच्या ओठी रेंगाळत आहेत.
विशेषतः अक्षय कुमारवर चित्रीत करण्यात आलेले 'मैं अल्कोहोलिक हूं' या गाण्याला दाद मिळत आहे. अक्षयचा मनमौजी अंदाज आणि यो यो
हनी सिंगच्या संगीताने गाण्याला हॉट अँड हॅपनिंग बनवले आहे. तसे पाहता अक्षयचा काही पहिल्यांदाच एखाद्या गाण्यात मद्य प्राशन करताना दिसत नाहीये. याचवर्षी रिलीज झालेल्या 'एन्टरटेन्मेंट' या सिनेमातील 'मैंने पी नई है पिला दी गई है' या गाण्यात तो या अंदाजात दिसला आहे.
मागे वळून पाहिले असता, अल्कोहोल बेस्ड गाण्यांनी मोठ्या पडद्यावर धूम केली आहे. बॉलिवूड आणि मद्य याचे जुने नाते आहे. अनेक गाणी खास दारुवर तयार करण्यात आली आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही अल्कोहोलिक गाण्यांविषयी सांगत आहोत...