आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘2 स्टेट्स’च्या प्रमोशनवेळी आलिया-अर्जुनमध्ये पुन्हा दिसली जवळीक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता अर्जुन कपूर सध्या आपल्या '2 स्टेट्स' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे दोन्ही स्टार्स 8 एप्रिल रोजी कोलकात्यामध्ये पोहोचले होते. तिथे त्यांनी सिनेमाचे जोरदार प्रमोशन केले.
यावेळी पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आलिया खूपच आकर्षक दिसत होती. तसेच अर्जुन नेहमीसारखाच कूल अंदाजात दिसला.
सिनेमाच्या प्रमोशनवेळी पुन्हा एकदा अर्जुन आणि आलियामध्ये जवळीक दिसून आली. '2 स्टेट्स' प्रमोट करताना आलिया थोडी उदाससुध्दा दिसत होती. उदास असलेल्या आलियाने अर्जुनला अलिंगन दिले. दोन्ही स्टार्सनी यावेळी सिनेमाविषयीच्या काही रंजक गोष्टी शेअर केल्या.
आलिया-अर्जुन अभिनीत '2 स्टेट्स' हा एक रोमँटिक-ड्रामा आहे. सिनेमाची कहाणी चेतन भगत यांच्या '2 स्टेट्स' या कादंबरीवर रेखाटण्यात आली आहे. सिनेमात अर्जुन आणि आलियाने रोमँटिक जोडीची भूमिका वठवली आहे.
'2 स्टेट्स' हा एका पंजाबी तरुण आणि दाक्षिणात्य तरुणीच्या प्रेकथेवर आधारित सिनेमा आहे. चेतन भगत यांच्या या कादंबरीला प्रकाशित झाल्यानंतर उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. कदाचित हे लक्षात घेऊनच निर्मात्याने या कादंबरीवर सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला असावा. कारण त्यांना या सिनेमाकडून ब-याच अपेक्षा आहेत. सोबतच, सिनेमाची कहाणी तरुणाईच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मनने केले असून साजिद नाडियाडवाला आणि करण जोहर यांनी मिळून निर्मिती केली आहे. '2 स्टेट्स'मध्ये आलिया-अर्जुन व्यतिरिक्त रोनिट रॉय, अमृता सिंह, रेवती आणि अंकित चित्रालसुध्दा महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिषेकच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा सिनेमा 18 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा '2 स्टेट्स'च्या प्रमोशन करण्यासाठी कोलकातामध्ये पोहोचलेल्या आलिया आणि अर्जुनची काही छायाचित्रे...