आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई एअरपोर्टवर वेगवेगळे दिसले आलिया-अर्जुन, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचा '2 स्टेट्स' रिलीज होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सिनेमाचे हे दोन्ही स्टार्स प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सिनेमाला हिट करण्यासाठी आलिया-अर्जुन ठिक-ठिकाणी जाऊन सिनेमा प्रमोट करत आहेत. अलीकडेच हे दोन्ही स्टार्स आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कोलकात्यामध्ये आले होते. 9 एप्रिलच्या संध्याकाळी आलिया आणि अर्जुन कोलाकात्यावरून मुंबईला परतले.
मुंबई एअरपोर्टवर आलिया आणि अर्जुन यांना बघितल्या गेले. परंतु यांना बघून यावेळी थोडे आश्चर्य वाटले. कारण हे दोन्ही स्टार्स एअरपोर्टवर वेगवेगळे पोहोचले. दोन्ही स्टार्स मुंबईच्या एअरपोर्टवर आले आणि आपआपल्या कारमध्ये निघून गेले. तसे पाहता दोघे एकमेकांसोबत नसूनदेखील सोबत होते. आलिया-अर्जुन जेव्हा एअरपोर्ट पोहोचले तेव्हा दोघेही डेनिम शर्टमध्ये दिसले. हे दोघे जरी एअरपोर्टवर वेगवेगळे पोहोचले असले तरी त्यांच्या ड्रेसकडे बघता ते एकमेकांच्या किती जवळ आहेत याची जाणीव होते.
आलिया-अर्जुन कोलकात्यावरून मुंबईला परतल्यानंतर 9 एप्रिलला 'मै तेरा हीरो'च्या सक्सेस पार्टीत पोहोचले होते. तिथे मात्र दोघे एकत्र दिसले.
बॉलिवूडच्या या दोन्ही स्टार्सला '2 स्टेट्स' सिनेमाकडून ब-याच अपेक्षा आहेत. अर्जुनचा यावर्षी 'गुंडे' रिलीज झाला आहे. आलियाने आतापर्यंत केवळ तीन सिनेमांमध्ये काम केले आहे. तिचा यावर्षी 'हायवे' सिनेमा रिलीज झाला आहे.
आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर यांचा '2 स्टेट्स' हा एक रोमँटिक सिनेमा असून अभिषेक वर्मनने दिग्दर्शित केला आहे. अभिषेक दिग्दर्शित हा सिनेमा 18 एप्रिलला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा मुंबई एअरपोर्टवरील आलिया-अर्जुनची छायाचित्रे...