आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEOमध्ये पाहा आलिया भट्ट कशी झाली \'जिनीअस ऑफ द इअर\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट)
मुंबई: 'स्टुडेंट ऑफ द इअर', 'हायवे', '2 स्टेट्स' आणि 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'सारख्या सिनेमांनी प्रेक्षकांना प्रभावित करणारी अभिनेत्री आलिया भट्ट आता स्मार्ट झाली आहे. असे आम्ही नव्हे एक व्हिडिओ सांगत आहे. एआयबीने तिच्यावर एक व्हिडिओ तयार केला आहे. त्यामध्ये आलिया भट्ट मुर्ख नसून स्मार्ट झाल्याचे दिसून येत आहे.
करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'च्या एका एपिसोडमध्ये आलिया भट्टने काही प्रश्नांची उत्तर न दिल्याने सोशल मीडियावर ती टार्गेट झाली होती. त्या प्रकाराला समोर ठेऊन हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. हा व्हिडिओ एक गंमतीशीर शॉर्ट फिल्मच्या फॉर्मेटमध्ये आहे.
व्हिडिओमध्ये आलियाशिवाय परिणीती चोप्रा, करण जोहर आणि महेश भट्ट दिसत आहेत.
का झाली सोशल मीडियावर टार्गेट?
करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये आलिया भट्ट विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर सांगताना म्हणाली होती, की भारताच्या राष्ट्रपतीचे नाव पृथ्वीराज चौहान आहे. एवढेच नव्हे तर अभिनेता वरुण धवनने मनमोहन सिंग हे भारताचे राष्ट्रपती असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सोशल मीडियावर आलिया भट्टच्या सामान्य ज्ञानावर खिल्ली उडवली जाऊ लागली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आलियाचा स्मार्ट व्हिडिओ...