आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: 'सिटी लाइट्स' बघितल्यानंतर आलियाला कोसळले रडू, जाणून घ्या का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: हंसल मेहताचा 'सिटी लाइट्स' हा सिनेमा बघितल्यानंतर नवोदीत अभिनेत्री आलिया भट्ट भावूक झाली आणि सिनेमा बघता-बघता रडायला लागलीय या सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारणारा राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या दमदार अभिनयाचीसु्ध्दा तिने बरीच प्रशंसा केली.
हा सिनेमा फॉक्स स्टार स्टुडिओने महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांच्या सहयोगाने बनलेला आहे. अलीकडेच, आलिया या सिनेमाच्या एक स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचली होती. यावेळी आलियाने आपल्या वक्तव्यामध्ये सांगितेल, 'सिनेमा बघितल्यानंतर मी अवाक झाले. सिनेमा जबरदस्त आहे. हा सिनेमा बघणे म्हणजे सिनेमाची एक वेगळी बाजू आणि स्वरुप बघण्यासारखे आहे.'
या सिनेमात राजकुमार राव आहे. त्याने यापूर्वी 'शाहिद' सिनेमामध्ये दमदार अभिनय केला होता. त्यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आलियाने म्हणाली, 'पत्रलेखाचा हा पहिला सिनेमा आहे. तरीदेखील तिचा दमदार अभिनय बघून मीच आश्चर्यचकित झाले, कारण मीसुध्दा ते करू शकत नाही.'
हा सिनेमा एका राजस्थानच्या व्यापा-याच्या जीवनकथेवर आधारित आहे. तो आपल्या पत्नी आणि मुलीसह एक चांगले आणि सोयीयुक्त आयुष्य जगण्यासाठी शहरात जातो. हा सिनेमा 30 मे रोजी रिलीज होणार आहे. सिनेमाचा मुख्य अभिनेता राजकुमार रावने यापूर्वी 'काय पो छे' आणि 'शाहिद' सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारलेली आहे. त्यासाठी त्याची बरीच प्रशंसा झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'सिटी लाइट्स'ची काही दृश्य आणि स्क्रिनिंगवेळई स्टार्सची छायाचित्रे...