आलिया भट्ट
मुंबई: आलिया भट्ट बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेत्री होण्याच्या मार्गावर आहे. सध्या ती 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी असल्याचे दिसत आहे. या सिनेमात तिचा को-स्टार वरुण धवन असून, त्याचा मागील सिनेमा यशस्वी झाला आहे. सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान आलियाची सर्वात खास गोष्ट म्हणजे तिचा लूक...
सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये आलिया जास्तित जास्त शॉर्ट ड्रेसमध्येच दिसते. कधी टी-शर्ट तर कधी शर्टसह ती शॉर्ट्स लूकमध्ये दिसते. प्रमोशनदरम्यान तिने कधी डेनिम तर कधी नॉन डेनिम शॉर्ट्स परिधान केले. जेव्हा मुंबईमध्ये सिनेमाचा प्रोमो लाँच झाला होता तेव्हा ती पंजाबी सुटमध्ये दिसली होती. आलिया जेवढे कष्ट सिनेमामध्ये करते तेवढेच कष्ट ती सिनेमाच्या प्रमोशनसाठीसुध्दा करते. कारण, शुटिंगदरम्यान तिच्या पायाला जखम झाली होती, तरीदेखील तिने सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कोणताही अडथळा येऊ दिला नाही.
आलियाच्या लूक्समध्ये सर्वात खास गोष्ट म्हणजे, तिचे शूज. फुटविअरमध्ये तिची लेटेस्ट फॅशन एडिडासचे विविध प्रकारचे स्नीकर्स शूज आहेत.ती हे शूज शॉर्ट्स व्यतिरिक्त ती शॉर्ट ड्रेसेसवरसुध्दा परिधान करते. एअरपोर्ट, पार्टी, इव्हेंटव्यतिरिक्त सिनेमाच्या 'सॅटरडे संडे' या गाण्यातसुध्दा तिने विंग्ड स्नीकर्स परिधान केले आहे. सिनेमाच्या प्रमोशनव्यतिरिक्त ती इतर इव्हेंटमध्येसुध्दा या लूक्समध्ये दिसते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'च्या विविध इव्हेंटमध्ये आलियाचे 12 लूक्स...