आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलियाने व्होगसाठी दाखवले ग्लॅमर, पाहा फोटोशूटचे PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलिया भट्ट
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने इंडिया मासिकाच्या जुलै 2014च्या अंकासाठी फोटोशुट केले आहे. आलिया भट्ट बॉलिवूडमध्ये गतीने लोकप्रिय होणा-या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करत आहेत. मात्र आपल्या ग्लॅमरस अवताराने तिला समीक्षक आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्याची इच्छा असल्याचे जाणवते. आपल्या ग्लॅमरस अवताराने ती प्रतिस्पर्धी अभिनेत्रींच्याही पुढे जाण्याची शक्यता दिसून येत आहे.
या फोटोशुटमध्ये आलिया खूपच वेगळ्या अंदाजात दिसली. एवढेच नाही तर, मासिकाच्या कव्हर पेजवर तिला बी-टाऊनची पुढील आगामी सुपरस्टार म्हणून लिहिण्यात आले आहे. आलियाने यापूर्वीसुध्दा 2012मध्ये व्होग मासिकासाठी फोटोशुट केले होते. सध्या ती 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तिचा को-स्टार वरुण धवन आहे.
आलिया भट्ट बॉलिवूडची नवोदित अभिनेत्री आहे. 'कॉफी विथ करन' चॅट शोमध्ये सहभाग घेतल्यानंतर तिच्या कमजोर सामान्य ज्ञानामुळे ती सोशल मिडियावर जोक्सच्या माध्यमातून चांगलीच प्रसिध्दीस आली होती. आलियाच्या नावाने सोशल साइट्सवर 'आलिया भट्ट ट्रोल्स' नावाचे एक पेज तयार करण्यात आले आहे. या पेजवर आलियाच्या जीक्यूविषयी जोक्स आणि कमेन्ट्स आहेत. या पेजला आतापर्यंत 3.9 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. याविषयी आलिया म्हणते, 'मी खूप इम्पलसिव्ह आहे. पहिला प्रश्न ऐकताच माझ्या तोंडात जे उत्तर येते ते ते मी बोलून टाकते. त्यामुळे लोक मला मुर्ख समजतात. परंतु मी स्वत:ला स्मार्ट दाखवण्यापेक्षा जशी आहे तसेच सादर करते. लोक काहीही समजो.'
ऐश्वर्याला रिप्लेस करायचे आहे...
आम्ही स्क्रिनवर भूमिका साकारतो, जर ऑफस्क्रिनसुध्दा भूमिका साकारायची असेल तर खूप थकवा जाणवतो. मला जगातील सर्वात मोठी आणि प्रसिध्द कलाकार होण्याची इच्छा आहे. मला ठाऊक आहे, लोक माझ्यावर प्रेम करतात. मात्र त्यांच्या मनात मला एका वेगळी छाप निर्माण करायची आहे. शहारातील छोट्या-छोट्या ब्यूटीपार्लर्समध्ये ऐश्वर्याचे पोस्टर्स लावलेले असतात. त्याचा अर्थ असा, की ऐश्वर्यासारखे दिसायचे असेल तर आमच्या इथे या. त्या पार्लर्समध्ये मला ऐश्वर्याच्या जागी माझे पोस्टर बघायचे आहेत.
जास्त ओळख करायला आवडत नाही
मला खूप कमी मित्र परिवार आहे. माझा फक्त सहा मित्रांचा ग्रुप आहे. मला लोकांशी जास्त क्लोज जाणे आवडत नाही. म्हणून जो कुणी माझ्या जवळ येण्याचा आणि मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करतो त्याला मी दूरच ठेवते.
सेक्सी शब्दांचा तिरस्कार
माझ्यासोबत राहणारे मुले म्हणतात, की चांगली गर्लफ्रेंड होऊ शकते. कारण मी खूप साधी आहे. सुंदर दिसणा-या तरुणींमध्ये जो गर्विष्टपणा असतो तो माझ्यात नाहीये. मला माझ्यासाठी सेक्सी शब्दांसारखे शब्द वापारलेले आवडत नाहीत.
रिलेशनशिप स्वीकार करण्यात भिती वाटते
जर तुम्ही मला माझ्या खासगी आयुष्याविषयी विचाराल तर मी खोट नाही बोलणार. मी जर कुणाच्या नात्याला स्वीकार केले आणि उद्या आमचे ब्रेकअप झाले तर सर्व दोष माझ्या माथी थोपले जातील. असे खूप जाणांसोबत घडले आहे आणि मी ते बघितले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आलियाच्या फोटोशुटची काही छायाचित्रे...