आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alia Bhatt, Parineeti Chopra Perform At IIAA 2014

IIAA 2014मध्ये आलिया-परिणीतीने केला डान्स, रेड कार्पेटवर अवतरले सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(IIAA इव्हेंटमध्ये डान्स परफॉर्मन्स देताना आलिया आणि परिणीती)
मुंबई - बॉलिवूडच्या तरुण अभिनेत्री आलिया भट्ट आणि परिणीती चोप्रा यांनी रविवारी मुंबईत आयोजित IIAA 2014 (International Indian Achiever’s Award) इव्हेंटमध्ये डान्स परफॉर्मन्स दिला. या दोघींनी आपल्या सादरीकरणाने या इव्हेंटला चारचाँद लावले. इव्हेंटमध्ये बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींची झलक बघायला मिळाली.
जागतिक स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणा-या दिग्गजांना IIAAच्या वतीने यावेळी सन्मानित करण्यात आले. या इव्हेंटमध्ये बॉलिवूडचे हीमॅन अर्थातच धर्मेंद्र शत्रुघ्न सिन्हासह सहभागी झाले होते. याशिवाय आयुष्मान खुराना, राजू श्रीवास्तव, पूनम ढिल्लोन, रॅपर हार्ड कौर, फॅशन डिझायनर शायना एनसी, पद्मिनी कोल्हापुरे, सुनिधी चौहान यांचीही झलक बघायला मिळाली.
या कार्यक्रमाचे आयोजन अभिनेत्री पूनम ढिल्लोन आणि मिराकॅम इंडस्ट्रीते एमडी अनिल मुरारका यांनी केले होते.
पुढे पाहा, IIAA 2014 इव्हेंटमध्ये आलिया आणि परिणीतीच्या परफॉर्मन्सची झलक आणि रेड कार्पेटवर पोज देणा-या सेलेब्सची छायाचित्रे...