आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनी आणि किसींगसाठी तयार, मात्र न्यूड सीन करणार नाही आलिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री आणि महेश भट्ट याची कन्या आलिया भट्टचे म्हणणे आहे, की किसींग सीन करण्यास आणि बिकिनी परिधान करण्यास तिला अडचण नाहीये. आलिया म्हणते, 'मला माहितीये तुम्हाला कसे बनायचे आणि तुम्ही तुमच्या करिअरला कसे पुढे नेणार आहात. या सर्वांविषयी तुमचे काही विचार असतील. मला नाही वाटत, की कोणाचीही विचारधारणा एकसारखी असेल.'
ती पुढे म्हणते, 'जर एखाद्या सिनेमासाठी किसींग आणि बिकीनी सीन्स गरजेचे असतील तर ते मी करेल. परंतु ते अनावश्यक असतील तर त्यावर मी माझा निर्णय घेईल. सिनेमासाठी मी कधीही न्यूड होणार नाही.'
आलियाने '2 स्टेट्स'मध्ये अर्जुन कपूरसोबत किसींग सीन दिले आहेत. तसेच, 'स्टुडेंट ऑफ द इअर'मध्ये बिकिनी परिधान केली होती.
आलियाने याविषयी आणखी सांगितले, 'मला वाटते, की तुमचे विचार आणि तुम्ही स्वत:ला लोकांपुढे कशाप्रकारे सादर करताय हे तुम्हाला लावलेल्या संस्कारावर अवलंबून असते.'
आलिया सध्या आपल्या '2 स्टेट्स' या आगामी सिनेमामधील किसींग सीन्समुळे चर्चेत आहे. हा सिनेमा 18 एप्रिलला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आलियाच्या बिकिनी आणि किसींग सीनची कहाणी...