आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलिया करतेय शाहिदवर स्तुतीसुमनांची उधळण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेच रणबीर कपूरसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करणारी अभिनेत्री आलिया भट्ट शाहिदवरसुद्धा बरीच इम्प्रेस झालेली दिसत आहे. म्हणूनच तर शाहिदचे कौतुक करताना आलिया मुळीच थकत नाहीये.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आलियाने शाहिद कपूरसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिच्या मते शाहिद केवळ उत्कृष्ट अभिनेताच नव्हे तर उत्तम डान्सरसुद्धा आहे.
विशेष म्हणजे विकास बहलच्या आगामी सिनेमात आलिया आणि शाहिद एकत्र झळकण्याची शक्यता आहे. एकीकडे आलिया शाहिदवर स्तुतीसुमने उधळत आहे, तर दुसरीकडे शाहिदसुद्धा आलियाचे कौतुक करताना दिसला होता. कॉफी विथ करणच्या चौथ्या पर्वात शाहिद सहभागी झाला होता. तेव्हा करणने शाहिदला प्रश्न विचारला होता, की आलिया आणि परिणीतीपैकी कुणाचे भविष्य उज्ज्वल आहे, तेव्हा शाहिदने आलियाच्या नावाचा उल्लेख केला होता.