आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIX: म्युझिक रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओत पोहोचलेल्या आलियाचा दिसला कूल LOOK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आलिया भट्टचा आगामी सिनेमा म्हणजे 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'. या सिनेमासाठी आलिया खूप उत्साही असून ती जोमाने प्रमोशनला लागली आहे. रविवारी ती एका म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओत पोहोचली होती. येथे तिच्या सिनेमाचे म्युझिक रेकॉर्डिंग सुरु होते.
यावेळी आलिया नेहमीप्रमाणे शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. आलियाने आपले केस मोकळे ठेवले होते आणि तिने पायात ब्लॅक शू घातले होते. ती यावेळी खूप कूल दिसली. तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे, यावेळी तिच्या हातात छडी किंवा पायला बँडेज दिसले नाही. काही दिवसांपूर्वी एका गाण्याच्या शुटिंगदरम्यान आलियाच्या पायला दुखापत झाली होती. दुखापतग्रस्त होऊनदेखील आलिया आपल्या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसली होती. तिने ट्विट केले होते, "For all those asking, thank you my leg is much better!! It's a calf muscle injury... I will be back to normal in no time :D love you all,"
स्टुडिओत पोहोचलेल्या आलियासह 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'चे संगीतकार शारिब आणि तोशी हजर होते. आलियाच्या मागील सर्व सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा म्युझिक स्टुडिओत पोहोचलेल्या आलियाची छायाचित्रे...