बॉलीवूडमध्ये पदार्पणापासूनच आलिया भट्ट चर्चेच आहे. कधी चित्रपटांमुळे तर कधी रिलेशनशीपमुळे तर आता ती चर्चेत आहे, फोटोशूटमुळे. हिरो मोटोकॉर्पने नुकतीच तिला ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. 21 वर्षीय आलियाच्या मोठ्या फॅन फॉलोविंगमुळेच कंपनीने तिला निवडले आहे.
सध्या आलियाच्या ‘हम्पटी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटातील ग्लॅमरस लूकला पसंती मिळत आहे. 2012 मध्ये स्टुडंट ऑफ द ईअर या चित्रपटाद्वारे पदार्पण करणा-या आलियाची चित्रपटसृष्टीतील उंची दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत आलेले तिचे सर्व चित्रपट यशस्वी ठरले असून तिच्या भूमिकेचेही कौतुक झाले आहे.
यासर्वामुळेच अत्यंत कमी कालावधीत आलिया अनेक ब्रँडशी संलग्न जाली आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिकांवरही तिची छाप दिसून आली आहे. नुकतेच आलियाने फ्रेंच फॅशन मासिक L'Officiel च्या मे 2014 च्या अंकासाठी खास फोटोशूट केले. त्याचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. यात आलियाचे विचित्र चेहरे दिसून आले आहेत.
याआधीही बॉलीवूडच्या काही अभिनेत्रींनी असे विचित्र फोटोशूट केले आहेत, पाहुयात असेच काही PICS...