शाहिद कपूर आणि आलिया भट्ट विकास बहल दिग्दर्शित ‘शानदार’मध्ये सोबत काम करणार आहेत. सिनेमात आलिया आणि शाहिद ‘इनसोमेनिया’ म्हणजे झोप न येण्याच्या आजाराने त्रस्त असलेल्या पीडितांची भूमिका साकारणार आहेत. मध्यरात्रीपर्यंत जागरण करण्याची या दोघांची सवय दोघांमधील मैत्रीचे प्रमुख कारण बनते. ही मैत्री नंतर प्रेमामध्ये रूपांतरित होते. सिनेमाचे शुटिंग पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी प्रियंका चोप्रा आणि
रणबीर कपूरच्या ‘अनजाना अनजानी’मध्ये आत्महत्येचा प्रयत्न करण्याची सवय असलेल्या दोन लोकांच्या कथेचा समावेश होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला पसंती मिळाली नाही.
आलिया सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे. शिवाय शाहिदचा राऊडी अवतारदेखील प्रेक्षकांना भावला होता. अशा परिस्थितीत दोन अस्वस्थ प्रेमी बनून प्रेक्षकांमध्ये एक नंबर राहण्यासाठी ही जोडी प्रयत्न करणार, असे दिसते आहे.